महिलांना शेतीपुरक व्यवसाय काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:43 PM2019-07-29T21:43:02+5:302019-07-29T21:43:18+5:30

राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.

Women need farming business time | महिलांना शेतीपुरक व्यवसाय काळाची गरज

महिलांना शेतीपुरक व्यवसाय काळाची गरज

Next
ठळक मुद्देराहुल ठाकरे : बचत गट महिला कार्यशाळेला चार हजार महिलांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.
येथील सहकार मंगल कार्यालयामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचालित साधन केंद्र व राष्ट्रसंत ग्रामसमृध्दी संकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बचत गट प्रमुख प्रेमा सालंकार, होत्या. उद्घाटक राहुल श्रीधर ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई, खादी ग्रामोद्योग नागपुरचे एन.व्ही. गुढे उपस्थित होते.
त्याप्रसंगी राहुल ठाकरे यांनी जीवन जगत असताना जशी आॅक्सीजनची गरज भासते तशीच महिला बचत गटांना सक्षमीकरण व मार्केटींगची गरज ही काळाची बनली आहे. ग्रामीण व शहरी भागातील बचत गटांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या भागातील बचत गट आर्थिक परिस्थितीने ढासाळलेला आहे. त्याला कारण म्हणजे बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला योग्य ती मार्केटींगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बचत गट आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्या बचत गटांना आंधारातून प्रकाशामध्ये आणु, महिलांना शेतीपुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे. यावेळी मधुमक्षिका पालन प्रात्याक्षिक देवून पेटी वाटप करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत करणार असल्याचे सांगितले.
त्याप्रसंगी जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई म्हणाल्या की, महिलांनी माझ्यात कशाची तरी उणीव आहे असे कधीच भासु नये कारण स्वत:चे नकारात्मक विचार माणसाला कमतरतेची जाणीव करून देतात पण स्त्री शक्तीने आपण कोणत्याही आलेल्या संकटांचा सामना करू शकतो, असा निर्धार केला पाहिज. यावेळी उपस्थित अतिथींनी महिलांना मार्गदर्शन केले व योजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सुजाता लोहकरे तर प्रास्ताविक वैशाली देशमुख यांनी केले, आभार स्मिता भेंडे यांनी मानले.

Web Title: Women need farming business time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.