शेतीसंबंधी निर्णयात महिलांचा सहभाग गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:04 PM2017-10-15T23:04:12+5:302017-10-15T23:04:40+5:30
महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. शेती व शेती संबंधी निर्णयामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे अतुल शेंद्रे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. शेती व शेती संबंधी निर्णयामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे अतुल शेंद्रे यांनी केले. ते सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत वर्धा सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समन्वयक डॉ. प्रशांत उंबरकर, शास्त्रीय सल्लागार समिती सदस्य संध्या माणिकपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान पशु व दुग्ध संवर्धन विषयाचे शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी यांनी कुक्कुटपालन व कुक्कुटपालन दरम्यान घ्यावयाची काळजी तसेच तंत्रज्ञान व मार्केटींग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार शेतीला व्यावसायिक दृष्टीकोणातून महत्व प्राप्त होण्यासाठी किसान महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. करीता महिला किसान दिवस देशभरात साजरा करणे गरजेचे आहे. महिलांना फक्त मजूर म्हणून संबोधिले जाते. परंतु पिकांच्या लागवडीपासून ते पीक काढणी पर्यंतची जास्तीत जास्त कामे ही महिलाच करतात, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमात महिलांना ट्रान्सप्लांटर बद्दल प्रात्याक्षिकातून माहिती देण्यात आली.
मार्गदर्शन करताना शास्त्रीय सल्लागार समिती सदस्या संध्या माणिकपुरे यांनी शेती दरम्यान येणाºया समस्यांना कसे सामोरे जावे यावर उदाहरणे देत मार्गदर्शन केले. शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा याकरिता कृषी व किसान कल्याण मंत्रालय तर्फे ३० टक्के निधी हा किसान महिला विकासासाठी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात १३५ महिलांनी सहभागी होऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमादरम्यान काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंकिता अंगाईतकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कांचन तायडे यांनी मानले. सदर उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या न्याय हक्कासह विविध व्यवसायांची माहिती माहिती देण्यात आली. यावेळी महिलांना शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषी विज्ञान केंद्र, सेलसुराचे विशाल उंबरहांडे, प्रा. उज्वला सिरसाट, गजानन म्हसाळ, किशोर सोळंके, पायल उजाडे, वैशाली सावके, समीर शेख, प्रवीण भुजाडे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.
विविध शेतीपूरक व्यवसायाची माहिती
सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात १३५ महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी महिलांना विविध शेतीपूरक व्यवसायाची माहिती सोप्या शब्दात दिली. इतकेच नव्हे तर यावेळी मान्यवरांनी महिलांना शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली.