मक्त्याच्या शेतीतून उभा केला महिलांनी संसार

By Admin | Published: June 4, 2015 01:52 AM2015-06-04T01:52:07+5:302015-06-04T01:52:07+5:30

महिलांनी उद्योग उभारणे ही बाबच आजही पुरुषांच्या पचनी पडलेली नाही. त्यातही काही महिलांनी उद्योग उभारण्याचा विडा उचललाच तर फार फार तर लोणची, पापड ...

Women raised their world through farming | मक्त्याच्या शेतीतून उभा केला महिलांनी संसार

मक्त्याच्या शेतीतून उभा केला महिलांनी संसार

googlenewsNext

पराग मगर वर्धा
महिलांनी उद्योग उभारणे ही बाबच आजही पुरुषांच्या पचनी पडलेली नाही. त्यातही काही महिलांनी उद्योग उभारण्याचा विडा उचललाच तर फार फार तर लोणची, पापड यापुरते ते मर्यादित राहतात किंवा ठेवले जातात. त्यातच कृषी हे क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. स्त्रिया केवळ मजुरीचीच कामे करतात. पण ही मक्तेदारी मोडीत काढत बचत गटाच्या माध्यमातून मक्त्याने शेती करून आपल्या संसार उभारण्याची किमया मातोश्री मालिनी महिला मंडळद्वारे अक्षर संयुक्त देयता गटाद्वारे बोरगाव (आलोडा) येथील पाच महिलांनी करून दाखविली.
मंगला राऊत, वैशाली कराळे, वंदना पवार, कुसूम टिपले आणि भाग्यश्री झामरे अशी या महिलांची नावे आहेत. शेतीच सध्या परवडेनाशी झाल्याची वल्गना केली जाते. त्यातही मक्त्याची शेती करणारे हे पुरुषच असतात. परंतु शेतीच्या कामाची सवय असलेल्या बोरगाव (आलोडा) येथील या पाच जणींनी नाबार्ड प्रकल्पांतर्गत मातोश्री मालिनी महिला मंडळ वर्धा द्वारा अक्षर संयुक्त देयता गट, बोरगाव (आलोडा) ची स्थापना केली. आणि गटांतर्गत मक्त्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दर महिन्याला १०० रुपयांची बचत जमा करण्याचा निर्णय घेतला. नाबार्डच्या सहाय्यक महाप्रबंधक डॉ. स्नेहल बन्सोड व योगिनी शेंडे यांनी गट कशाप्रकारे चालवावा व मक्त्याची शेती करताना कोणकोणत्या अडचणी येतात तसेच त्या कशा हाताळाव्या याबाबत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे आर्थिक बाबतीत आलेले जिकरीने प्रश्न कसे नेटाने सोडवावे याची माहिती दिली.
सर्वप्रथम त्यांनी बॅँक आॅफ इंडिया, बोरगाव (मेघे) या शाखेतून ३१ डिसेंबर २०१३ रोजी ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. यातून मक्त्याने शेती घेऊन त्यात गहू, हरबरा आदी पिके घेतली. पाचही जणी मिळून शेतात राबायच्या. यात त्यांना बँकेच्या कर्जाची परतफेड करून १० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे त्यांची हिंम्मत वाढली. त्यांनी पुन्हा साडेचार एकर शेती मक्त्याने करून त्यात कापूस व तुरीची लागवड केली. याकरिता बँकेने त्यांना ७० हजारांचे कर्ज दिले. या काळात बियाणे व खतांचे भाव वधारले. पावसानेही दगा दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. तरीही हिमतीच्या जोरावर पिकांची मशागत केली. पिकांवर रोग पसरल्याने उत्पन्नात घट झाली. या काळात जोमाने कार्यकरण्यासाठी डॉ. बन्सोड यांनी खूप धीर दिल्याचे या पाचजणी सांगतात.
हंगामात माल निघाल्यानंतर १५ क्विंटल कापूस व आठ क्विंटल तुरी झाल्या. मालाचे भाव पडल्याने त्यांना नुकसान सोसावे लागले. यात गटाला नफा मिळाला नाही. परंतु हिम्मत हारली नसल्याचे त्या सांगतात. तसेच पुन्हा मक्त्याची शेती करणार असल्याचेही हिमतीने सांगतात. कुठलेही तारण नसताना या पाच जणींनी हिमतीच्या जोरावर ही मक्त्याची शेती करून दाखवित जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला.

सुरुवातीला त्रास झाला
आतापर्यंत शेतात मजुरी करीत असल्याने शेतीच्या कामाची जाण होती. नफ्या तोट्याचीही जाणीव होती. प्रत्यक्ष शेती करताना मात्र दिव्यातून जावे लगले. शेतीतून नुकसानच होते अशा अनेकांच्या भावना असल्याने तणाव होतात. परंतु सर्व संकटांना सामोरे जात त्यांनी पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत मक्त्याची शेती करून दाखविली. आता हिम्मत वाढल्याचेही त्या गर्वाने भावना व्यक्त करतात.

Web Title: Women raised their world through farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.