पिपरीत साकारणार महिला बचत गटाचे भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:17 PM2019-06-30T21:17:10+5:302019-06-30T21:17:24+5:30
महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ग्रामीण व शहरी भागात बचत गटांचे जाळे विणल्या गेले आहे. याच्या माध्यमातून महिलांनी आपल्या विकासवाटाही शोधल्या असून महिला बचत गटासाठी भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिपरी ग्रामपंचायतच्या परिसरात महिला बचत गट भवनाची निर्मिती होणार असून हे भवन जिल्ह्यातील एकमेव ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ग्रामीण व शहरी भागात बचत गटांचे जाळे विणल्या गेले आहे. याच्या माध्यमातून महिलांनी आपल्या विकासवाटाही शोधल्या असून महिला बचत गटासाठी भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिपरी ग्रामपंचायतच्या परिसरात महिला बचत गट भवनाची निर्मिती होणार असून हे भवन जिल्ह्यातील एकमेव ठरणार आहे.
शहरातील मातोश्री सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९ लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या बचत गट भवानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, शिक्षण सभापती जयश्री गफाट, पिपरीचे सरपंच अजय गौळकर, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, पंचायत समिती राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, शेतक री मूल्य आयोगाचे प्रशांत इंगळे तिगावकर, बाजार समिती सभापती श्याम कार्लेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य जयंत कावळे, समाजसेवक संजय ठाकरे, सुनील बुरांडे, उमरी (मेघे) चे उपसरपंच सचिन खोसे, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना वानखेडे, फारूख शेख, रवी शेंडे, अजय वरटकर, बचतगटाच्या स्वाती वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार तडस व आमदार डॉ. भोयर यांचा सत्कार करण्यात आला. आज बचत गटाची मोठी चळवळ तयार झाली आहे. आता महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून नवीन संकल्पना अंमलात आणून आपले उत्पन्न वाढवून प्रगती साधावी, असे आवाहन खासदार तडस यांनी केले. बचतगटाच्या रुपात नवीक्रांती होत आहे. बचत गटांनी रोजगाराची निर्मिती करीत स्वयंरोजगाराची कास धरली.
पण, या बचत गटासाठी हक्काचे भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. त्याची फलश्रुती म्हणून पिपरीत भवन साकारल्या जात असल्याचे आमदार डॉ. भोयर यांनी सांगितले. संचालन रंजना लामसे यांनी तर आभार वैशाली गुजरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे, प्रशांत खंडार, वैभव चाफले, सुधीर वसू, मनीष मसराम, सुरेंद्र झाडे, अंकुश जीवने, राहुल दोडके, पंकज उजवणे, डॉ. विद्या राजेंद्र कळसाईत, भारती गाडेकर, कुमुद लाजूरकर, नलिनी परचाके, ज्योती वाघाडे, शुभांगी पोहाणे, महिला बचत गटाच्या अंजली कळमकर, वाघमारे, कांबळे, गुजरकर, पाटील, भारती अण्णावडे, वैशाली गोडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.