महिलांनी मोठे व्यावसायिक बनून आर्थिक प्रगती साधावी

By Admin | Published: June 19, 2017 01:15 AM2017-06-19T01:15:35+5:302017-06-19T01:15:35+5:30

व्यवसायाची वाढ करावयाची असल्यास कुशल कामगाराची आवश्यकता असते. महिलांनी कुशल कामगार बनूनू मोठे व्यवसायिक होत

Women should make big business and make economic progress | महिलांनी मोठे व्यावसायिक बनून आर्थिक प्रगती साधावी

महिलांनी मोठे व्यावसायिक बनून आर्थिक प्रगती साधावी

googlenewsNext

प्रदीप नाथ : महिलांसाठी लेदर बॅग व ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : व्यवसायाची वाढ करावयाची असल्यास कुशल कामगाराची आवश्यकता असते. महिलांनी कुशल कामगार बनूनू मोठे व्यवसायिक होत आर्थिक प्रगती साधावी करावी, असे प्रतिपादन भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे महाप्रबंधक प्रदीप नाथ यांनी केले. ते महिलांसाठी आयोजित लेदर बॅग व ड्रेस डिझाईनिंग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर नॅशनल इंन्स्टिट्युट आॅफ वुमन चाईल्ड अँड युथ डेव्हलपमेंट नागपूरच्या रोहिणी भालेराव, रोटरी क्लबच्या सुनीता इथापे, सीएमआरसी व्यवस्थापक नलू गौळकर, आशीष मोडक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या सहायाने व नॅशनल इंन्स्टिट्युट आॅफ वूमन चाईल्ड अँड युथ डेव्हलमेंट नागपूर व सयंसमर्थन लोक संचालित साधन केंद्र सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलांकरिता एक महिन्याच्या कालावधीचे लेदर बॅग व ड्रेस डिझाईनींग कौशल्यता विकास प्रशिक्षण शिबिराचे सेलू येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या आहेत.
मार्गदर्शन करताना सुनीता इथापे यांनी महिलांनी स्व ची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. आपले व्यक्तीमत्त्व व कौश्यल्याचा वापर करून आपला व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. बाजारात कुठल्या वस्तूची जास्त मागणी आहे त्याचा अभ्यास करून त्यापद्धतीने वस्तूची निर्मिती करणे आवश्यक असून तसे प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाच्या विक्री करता हक्काची जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिलांनी चुल आणि मुल या रूढी परंपरा मोडकळीस काढून पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रोहिणी भालेराव यांनी महिला बचत गटाना मदत करण्यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून अश्या कार्यशाळेचे नेहमी आयोजन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी आशीष मोडक यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन छाया गायकवाड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रोहिणी भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाला परशुराम, सेलघरे, कांबळे, सुटे, लोखंडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Women should make big business and make economic progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.