स्त्रियांनी संविधान वाचावे

By Admin | Published: April 11, 2016 02:22 AM2016-04-11T02:22:54+5:302016-04-11T02:22:54+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना अमर्याद अधिकार दिले आहे.

Women should read the constitution | स्त्रियांनी संविधान वाचावे

स्त्रियांनी संविधान वाचावे

googlenewsNext

मनीषा रिठे : संविधान जागृती अभियानात सभा
हिंगणघाट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना अमर्याद अधिकार दिले आहे. स्त्री हित व कल्याणाच्या तरतुदी यात केल्या आहे. स्त्री स्वावलंबी व्हावी, पुरुषांप्रमाणेच तिलाही समान हक्क मिळावे, म्हणून कायदे केले; पण आजही बहुसंख्य स्त्रियांना याची माहिती नसल्याचे दिसते. याकरिता स्त्रियांनी संविधान वाचावे, असे आवाहन वैदर्भीय कवयित्री मनीषा रिठे यांनी केले.
स्थानिक माता मंदिर वॉर्ड येथे भारतीय संविधान जनजागृती अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या सभेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
माहितीअभावी महिलांना शोषण, अत्याचाराला बळी पडावे लागते. म्हणून भारतीय स्त्रियांनी एकदातरी संविधान वाचून आपले अधिकार व संरक्षणाविषयी असलेल्या तरतुदीची माहिती करुन घ्यावी, असे रिठे पुढे बोलताना म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता मांडवकर होत्या. संयोजन समितीप्रमुख अनिल जवादे यांनी भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार, देशातील नागरिकाने पार पाडावयाची कर्तव्ये याची माहिती दिली. विचारमंचावर डॉ. मेघश्याम करडे, अनिता मावळे, प्राचार्य बी.एस. पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक आर.के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, समन्वयक डॉ. चंद्रकांत नगराळे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, आनंद टिपले, माता मंदिर वॉर्ड कार्यक्रम प्रमुख प्रा. सूर्यकांत मावळे, प्रा. जयंत दाणी, गोपाल मांडवकर यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. उमेश ढोबळे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women should read the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.