महिला सक्षमीकरण व प्लास्टिक निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:33 PM2018-03-14T23:33:30+5:302018-03-14T23:33:30+5:30

हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत आर्वी आणि जाम शाखेतील महिलांना कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Women's empowerment and plastic eradication campaign | महिला सक्षमीकरण व प्लास्टिक निर्मूलन मोहीम

महिला सक्षमीकरण व प्लास्टिक निर्मूलन मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देहेल्पिंग हार्र्टसचा उपक्रम : कापडी पिशवी निर्मितीचे दिले प्रशिक्षण

ऑनलाईन लोकमत
वर्धा : हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत आर्वी आणि जाम शाखेतील महिलांना कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.
यानिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. यातून महिलांना कागदी बॅग, कापडी पिशवी तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. प्लास्टिक निर्मूलन मोहिमेची माहिती दिली. प्लास्टिक पिशवीचा वापर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त कापडी बॅग, कागदी बॅगसचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. तसेच कापडी व कागदी बॅग तयार करण्याचे काम आपल्या गावातही सुरू करावे असे आवाहन संस्था अध्यक्ष सोनाली श्रावणे यांनी महिलांना केले.
पी.व्ही. टेक्सटाईल येथील महिलांना अर्चना झालटे यांनी कापडी बॅगसचे मार्केटींग तसेच कागदी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. दिपाली लोटे यांनी बॅगस निर्मितीचे प्रशिक्षण दिले. पी.व्ही. टेक्सटाईल येथील आॅफीसर्स व वर्कस यांच्या कुटुंबातील महिलांचे यात सहकार्य केले. घरातील काम आटोपुन या महिला पिशवी तयार करू शकतात. फाव्ल्या वेळेचा यामुळे दसदुपयोग होईल हा विचार घेऊन हेल्पिंग हार्टस संस्थेने हा उपक्रम राबविला.
महिलांनी या प्रशिक्षणात आवडीने सहभाग घेतला. आम्हाला या उपक्रमाची आवश्यकता आहे. कापडी व कागदी बॅग तयार करण्याचे काम लवकरच सुरू करणार असा संकल्प महिलांनी केला. हिंगणघाट येथे तालुका प्रमुख सावित्री राठोड, वर्षा लाखे, अर्चना माकोडे या काम सांभाळत आहे. अश्विनी घाटे, निता जानी, शितल कुबडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Women's empowerment and plastic eradication campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.