महिला सक्षमीकरण ही वर्तमानाची गरज

By admin | Published: December 3, 2015 02:37 AM2015-12-03T02:37:26+5:302015-12-03T02:37:26+5:30

घराघरात महिला सक्षम असतील तरच कुटुंब, गाव आणि देश सक्षम होईल. सध्याच्या काळात बालशोषणाचे वाढते प्रमाण आणि बालिकांवरील होणारे लैंगिक अत्याचार, ...

Women's empowerment is the need of the present | महिला सक्षमीकरण ही वर्तमानाची गरज

महिला सक्षमीकरण ही वर्तमानाची गरज

Next

स्मिता पाटील : स्त्री घरापासून विश्वापर्यंत संवाद मेळावा
वर्धा : घराघरात महिला सक्षम असतील तरच कुटुंब, गाव आणि देश सक्षम होईल. सध्याच्या काळात बालशोषणाचे वाढते प्रमाण आणि बालिकांवरील होणारे लैंगिक अत्याचार, याला प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. यासाठी घरातूनच योग्य काळजी घेण्याची आणि मुलांना संस्कारक्षम वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांनी केले.
सावंगी येथील राधिका मेघे स्मृती परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाद्वारे आयोजित महिला संवाद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या वुमेन्स फोरमद्वारे संस्थांतर्गत कार्यरत महिला आणि विद्यार्थिनींकरिता ‘स्त्री
घरापासून विश्वापर्यंत’ यावर संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर नर्सिंग शिक्षण समन्वयक मनीषा मेघे, फिजीओलॉजी विभाग प्रमुख डॉ. रावेकर, प्राचार्य बी. डी. कुलकर्णी, प्राचार्य बेबी गोयल, नर्सिंग संचालक सिस्टर टेसी सॅबास्टियन, अधिष्ठाता वैशाली ताकसांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात ‘स्त्री-पुरुष समानता व घरगुती हिंसा’ यावर आयोजित प्रशिक्षणाचा अहवाल प्रा. जया गवई यांनी सादर केला. इंदू अलवाडकर यांनी महिला मंचाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी महिला सक्षमीकरण या विषयावर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिंनीकरिता आयोजित निबंधस्पर्धा आणि बालशोषण प्रतिबंध व संरक्षण यावरील नाटिका स्पर्धेतील विजेत्यांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. संचालन इंदू आलवडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी महिला अर्चना ताकसांडे, अर्चना तेलतुंबडे, खुशबू मेश्राम, बीबीन कुरीयन तसेच व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Women's empowerment is the need of the present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.