मायक्रो फायनान्स विरोधात सेलू येथे महिलांचा मोर्चा
By admin | Published: January 3, 2017 12:58 AM2017-01-03T00:58:41+5:302017-01-03T00:58:41+5:30
जिल्हाभर नाही तर राज्यभर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांना कर्ज देवून ते वसूल करण्याकरिता
पोलिसांत तक्रार : वसुली एजंटकडून महिलांना अश्लिल शिवीगाळ व धमकी
सेलू : जिल्हाभर नाही तर राज्यभर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांना कर्ज देवून ते वसूल करण्याकरिता नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले आहे. या संदर्भात महिलांकडून मोर्चे निघत आहेत. हा प्रकार ग्रामीण भागात अधिक असून त्रस्त महिलांनी सोमवारी सेलू तालुक्यात मोर्चा काढला. या महिलांनी हा मोर्चा थेट पोलीस ठाण्यात नेत या एजंटांविरोधात तक्रार दाखल केली.
मायक्रो फायनान्स कंपनीकडून प्रारंभी महिलांना आकर्षक कर्जाचे आमिष देत त्यांचे गट तयार करून कर्जाचे वितरण करण्यात आले. आता दिलेले कर्ज वसून करण्याकरिता या एजंटांकडून महिलांना त्यांच्या घरी जावून अपमानित करण्यात येत आहे. शिवीगाळ करून त्यांना धमक्या देण्याचे प्रकार घडत आहे. या विरोधात महिलांनी मोर्चे काढणे सुरू आहे. या महिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी कर्जाची परतफेड करण्यात आली आहे. मात्र या एजंटकडून कर्ज बाकी असल्याचे सांगण्यात येत असून महिलांना अपमाणित करण्यात येत आहे. यामुळे या कंपनीच्या एजंटने यात घोळ करून भ्रष्टाचार केल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे. यामुळे महिलांनी मोर्चा काढून पोलीस ठाण्यात कंपनीच्या एजंट विरूद्ध तक्रार दिली असून यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)