तरोड्याच्या नालाखोलीकरण कामांसाठी महिलांचा पुढाकार

By Admin | Published: May 30, 2015 12:20 AM2015-05-30T00:20:06+5:302015-05-30T00:20:06+5:30

आदर्श गाव म्हणून खासदार रामदास तडस यांनी तरोडा या गावाची निवड केली. आदर्श गावाच्या संकल्पनेनुसार विकास ....

Women's Initiative for Sewing Ceremony | तरोड्याच्या नालाखोलीकरण कामांसाठी महिलांचा पुढाकार

तरोड्याच्या नालाखोलीकरण कामांसाठी महिलांचा पुढाकार

googlenewsNext

कुंड नाल्याचे ३०० मीटर खोलीकरण : १० दिवसात काम करणार पूर्ण
वर्धा : आदर्श गाव म्हणून खासदार रामदास तडस यांनी तरोडा या गावाची निवड केली. आदर्श गावाच्या संकल्पनेनुसार विकास करतानाच शेती व पिण्याच्या पाण्याचे स्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण असलेल्या कुंड नाला खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. त्याचे नारळ सरपंच सुनिता टिकले यांनी फोडले.
आदर्श गावासाठी मूलभूत सुविधांचा विकास करतानाच टंचाईमुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. यात गावाशेजारी असलेल्या कुंड नाल्याचे ३२० मीटर खोलीकरण करून १५.२४ टीसीएम पाणी साठविण्याची क्षमता निर्माण होणारे काम महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, तालुका कृषी अधिकारी बिपीनकुमार राठोड, स्वप्नील शेळके, एस.के. राऊत उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतर्गत तरोडा गावाची निवड झाली आहे. ३२० मीटर नाल्याच्या खोलीकरणामुळे १५.२४ टीसीएम पाणी साठी निर्माण होणार आहे. सोबत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण होत १२.५७ हेक्टर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामावर ५ लक्ष २४ हजार ५३४ रुपयांचा खर्च असून हे काम येत्या दहा दिवसांमध्ये पूर्ण होईल असे डॉ. नाडे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावातील पाणी आराखडा तयार करण्यात आला आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण होणारी टंचाई गावाला आवश्यक असलेले पाणी तसेच उपलब्ध पाण्याच्या विनियोगाचे मुल्यमापन करण्यात आले आहे. पावसाचे पाणी अडविण्यासाठी कुंड नाल्याचे खोलीकरण करण्यासह साठवण बंधारे गाव तलाव, सिमेंट नालाबांध आदींच्या दुरूस्तीसह नवीन कामाचे ठराव ग्रामसभेतर्फे घेण्यात आले आहे. यासाठी १८०.५४ लक्ष रुपयांच्या निधीची मागणी आहे.
यावेळी उपसरपंच गणेश तिमांडे, सदस्य वर्षा भगत, बेबी उघडे, मुक्ता चांभारे, ज्योती बोरकर, मंगला झाडे, वनिता बावणे, गीता चांभारे, वनिता चांभारे, मंदा बलखंडे, ग्रा.पं. सदस्य उत्तम चांभारे, ग्रामसेवक इवनाते, आर.एम. आरगे, एस.एस. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Women's Initiative for Sewing Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.