पोलीस ठाण्यात महिला विश्रांती कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:50 PM2017-10-09T23:50:30+5:302017-10-09T23:50:43+5:30
येथील पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील पहिल्या महिला विश्रांती कक्ष सुरू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील पहिल्या महिला विश्रांती कक्ष सुरू करण्यात आला आहे. कक्षाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस स्टेशनमध्ये काम करताना महिला पोलीस कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तेव्हा सदर बाब ओळखुन प्रशासनाच्यावतीने महिला विश्रांती कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. समुद्रपूर येथे विश्रांती कक्षाची स्थापना करुन याची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक पराग पोटे, ठाणेदार महेंद्र ठाकुर, ठाणेदार प्रवीण मुंडे, उपविभागीय अभियंता मुत्तेलवार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोमाडे उपस्थित होते.
पोलीस स्टेशन परिसरात मंदिर व बगीचा तयार करुन उर्वरीत भागात विविध प्रजातीची झाडे लावून सुशोभित केल्याने सदर पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकन मिळावे, म्हणून नक्कीच प्रयत्न करेल असे मत पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांना सन्मानाची वागणूक द्या अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
पोलीस ठाण्याचा परिसर सुशोभित करण्याकरिता सहकार्य करणारे सनीबाबू पटेल, हरीओम गौशाळा ट्रस्टचे राजा मॅडमवार, रमेश भोयर, समाजसेवक कृष्णा व्यापारी, सुधीर खडसे यांचा पोलीस स्टेशनच्यावतीने शाल व श्रीफळ तसेच वडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. शशांक खांडरे तसेच गुरुसिंग बावरा यांचा यावेळी सत्कार केला.
कार्यक्रमात पराग पोटे, महिला पोलीस कर्मचारी शितल धाबर्डे, प्रा. मेघश्याम ढाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन ठाणेदार मुंडे यांनी केले. वामदेव सुरजे, अशोक चंहादे, अरुण झोटींग, रोहणकर, अजय घुसे, स्वप्नील वाटकर, मनोहर मुडे, राजू ठाकरे, चेतन पिसे, विरु कांबळे, राजू जयसिंगपूरे, रंजना चावरे आदींनी सहकार्य केले.