नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:14 AM2018-04-29T00:14:31+5:302018-04-29T00:14:31+5:30

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

Work with the citizens in confidence | नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करा

नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करा

Next
ठळक मुद्देरामदास तडस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. त्यांना नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
भिडी गावातील अंडरपासचा विषय, भुसंपादन प्रक्रियेतील त्रुटी इत्यांदी अनेक विषयावर स्थानिक नागरिक प्रशासनाकडे दाद मागून थकलले नागरिक हतबल होवून आंदोलनाच्या तयरीत होते. या सर्व विषयाची त्वरीत दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. रामदास तडस यांनी स्वत: भिडी गाव गाठत अधिकाऱ्यांना बोलावून गावकऱ्यांसमक्ष समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
खा. तडस म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे महामार्गाच्या कार्याला कुणाचाही विरोध नसून आपली जमीन या प्रकल्पाकरिता देणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न व स्थानिक नागरिकांच्या समस्या या शासनाने कालबद्ध वेळेत प्राधान्याने सोडविल्या पाहिजे. याकरिता आपण प्रयत्न करून, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे तांत्रिक प्रबधंक गंडी, दिलीप बिडकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक तलवार, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, राजेश रोकडे, विनोद पॉल, विजय घाटे, अजय झाडे, प्रशांत साठे, डॉ. काळे, अरूणकुमार हर्षबोधी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Work with the citizens in confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.