कोल्ही-ढिवरी रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:56 AM2017-12-24T00:56:56+5:302017-12-24T00:57:07+5:30

गावे शहरांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेला आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, असे नाव दिले आहे. योजनेचा उद्देश चांगला असला तरी काही काळापासून ती कुरणच ठरत आहे.

The work of Koli-Dhivri road is inconvenient | कोल्ही-ढिवरी रस्त्याचे काम निकृष्ट

कोल्ही-ढिवरी रस्त्याचे काम निकृष्ट

Next
ठळक मुद्देग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामाचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गावे शहरांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेला आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, असे नाव दिले आहे. योजनेचा उद्देश चांगला असला तरी काही काळापासून ती कुरणच ठरत आहे. ग्रामीण भाग शहरांशी जुळतोय; पण रस्त्यांची कामे दर्जाहीन होत आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. कोल्ही (खेकडी) ते ढिवरी (हिवरा) रस्ता तर ‘पूढे पाठ, मागे सपाट’ आहे. समोरचे काम सुरू असताना मागील रस्ता हातानेही उखरतो. यामुळे असंतोष असून दर्जदार रस्ता निर्मितीची मागणी होत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही (खेकडी) ते ढिवरी (पिपरी) या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले जात आहे. या मार्गावर ७३ लाख ८६ हजार रुपयांच्या निधी खर्चाची तरतूद आहे; पण एका दिवसातच रस्त्याने आपली लायकी दाखविल्याने बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, योजनेचे अभियंता, जि.प. अध्यक्ष व अधीक्षक कृषी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.
वर्धा-चंद्रपूर व यवतमाळ या तीनही जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या कोल्ही (खेकडी) या गावातून मुख्य बाजारपेठ वा शहराच्या ठिकाणी येण्यासाठी ४० किमीचा प्रवास करावा लागतो. यामुळे गाव तेथे रस्ता व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ७३ लाख ८६ हजार रुपये खर्चून (खेकडी) ते ढिवरी (पिपरी) पर्यंतचा १.५१ किमी लांब रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. यापैकी १.३९० किमी रस्त्याचे डांबरीकरण तर उर्वरित ०.१२ किमी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. या रस्त्याचे भूमिपूजन ३० एप्रिल रोजी झाले. सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे; पण हे काम निकृष्ट असून हातानेही रस्त्यावरील डांबर उखरले जाते. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही कंत्राटदाराकडून निकृष्ट बांधकाम केले जात असून ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तर दिली. यामुळे रस्त्याची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी व मजबूत रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाºयांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी अधीक्षक अधिकारी, जि.प. अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनावर सरपंच मंजूषा लडके, शाकेत डंभारे, दिनेश लढी, सचिन गुणवंत राऊत, दशरथ तिजारे, गजानन रोहणकर, संजय चौधरी, रवींद्र लढी, ज्ञानेश्वर पोते, प्रमोद पुनवटकर, विजय केशव ब्राह्मणवाडे, गुरूदेव बैलमारे, अमित सातपुते यांच्यासह ५३ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण
कोल्ही (खेकडी) ते ढिवरी (पिपरी) या रस्त्याचे कंत्राट देवळी येथील एका कंत्राटदाराकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंत्राटदाराने रस्त्याची रूंदीही कमी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे खोदकाम केले. हे खोदकाम करीत असताना शेतकºयांच्या बांधावर खोदून त्यातील माती व मुरूम रस्त्याच्या बांधकामात वापरला आहे. यामुळे लगतच्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण ग्रामस्थ उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
बहिष्कारानंतर मिळाला रस्ता
तीन जिल्ह्यांच्या सिमेवरील कोल्ही (खेकडी) गावात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. प्रारंभी या गावापर्यंत रस्ता नसल्याने ग्रामस्थांना खडतर प्रवास करावा लागत होता. एका व्यक्तीला सर्पदंश झाल्यावर रस्त्याअभावी रुग्णालयात पोहोचायला उशिर झाला. यामुळे त्याला जीव गमवावा लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तेव्हा २००१ मध्ये रस्ता झाला; पण तेव्हापासून दुर्लक्ष होते. आता १७ वर्षांनी डांबरीकरण होत असताना कंत्राटदार निकृष्ट काम करीत आहे. यामुळे पुन्हा बहिष्कार टाकावा काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
 

Web Title: The work of Koli-Dhivri road is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.