पवनार येथील पर्यटनस्थळाची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:13+5:30

येथील धाम नदी पात्रात मुरुम टाकल्यानंतर तो वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजुने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील मेडीटेशन हॉल, विसर्जन कुंडाची कामे अर्धवट स्थितीत आहे. विसर्जन कुंड तयार असला तरी त्या कुंडाकडे जाणारा रस्ता नसल्याने व कुंडात पाणी भरण्याची व्यवस्था न केल्याने एकाही गणपतीचे विजर्सन होऊ शकले नाही.

The work of the tourist place at Pawanar was kept up | पवनार येथील पर्यटनस्थळाची कामे रखडली

पवनार येथील पर्यटनस्थळाची कामे रखडली

googlenewsNext
ठळक मुद्देसेवाग्राम विकास आराखडा : सौदर्यीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनारच्या धाम नदी तीरावर दोन्ही बाजूने २६ कोटीच्या विकासकामाची धुमधडक्यात सुरूवात झाली. सौदर्यीकरणाच्या नावाखाली नदीपात्र मुरुम भरुन बुजविण्यात आल्याने यास पर्यावरणप्रेमींकडून मोठा विरोध झाला. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनीही याला विरोध दर्शविला होता. तरीही प्रशासनाकडून काम सुरुच ठेवले. पण, हल्ली या कामांना ब्रेक लागल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडतांना दिसून येत आहेत.
येथील धाम नदी पात्रात मुरुम टाकल्यानंतर तो वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजुने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील मेडीटेशन हॉल, विसर्जन कुंडाची कामे अर्धवट स्थितीत आहे. विसर्जन कुंड तयार असला तरी त्या कुंडाकडे जाणारा रस्ता नसल्याने व कुंडात पाणी भरण्याची व्यवस्था न केल्याने एकाही गणपतीचे विजर्सन होऊ शकले नाही. बांधलेल्या सरंक्षण भिंती पाहिल्याच पुरात जवळपास २० फुट कोसळली व तेथील मलबा पूर्ण वाहून गेला. यावरुन कामातील निकृष्ठता आणि नियोजनशुन्यता चव्हाट्यावर आली आहे.
या घाटावर शौचालय व कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी कुचंबना होत आहे. त्यांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नंदीखेडा परिसरात गावकऱ्यांसह पर्यटकांनाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे स्वातंत्र्य हिरावल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. येत्या २ आॅक्टोबरला गांधीजींची १५० वी जयंती साजरी होणार असल्याने त्या दिवसापर्यंत तरी सर्व विकास कामे पूर्ण होऊन पर्यटकांच्या सेवेत येईल, अशी अपेक्षा होती.परंतु कामच रखडल्याने पवनारवासीयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

आश्रमातील शांतता होतेय भंग
पवनारच्या धाम नदी तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम असून हा परिसर शांततेचे प्रतिक आहे. पण, सध्या या नियोजनशुन्य कामामुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या आश्रम परिसराची शांतता भंग होत असल्याची ओरड आश्रमवासीयांकडून केली जात आहे. येथील नंदीखेडा परिसर पूर्णत: बंदीस्त केला असून त्या ठिकाणी होणारा दशक्रियेचा विधी आता आश्रम परिसरात करावा लागत आहे. दत्त मंदिर परिसरात दशक्रिया विधीसाठी व्यवस्था केली तरी पुरेशा सोयी अभावी नागरिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.

धान नदी तीरावरील सौदर्यीकरणाची कामे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत असल्याने त्यावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण नाही. दशक्रियेसाठी नंदीखेडा परिसर खुला करून देणे गरजेचे आहे. कारण त्या ठिकाणी स्वतंत्र हॉल, कपडे बदलविण्याची जागा, शौचालय, पिण्याचे पाणी या सर्व सुविधा आहे. नियोजित जागेवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर जागा बदलविण्यास हरकत नाही. पण, प्रशासनाने तसे केले नसल्याने अडचणी वाढल्या आहे.त्यामुळे आता या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करणार आहे.
शालिनी आदमने, सरपंच,पवनार

Web Title: The work of the tourist place at Pawanar was kept up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.