वर्षभरात वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम जाणार पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:30+5:30

वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची होती.

Work on Wardha-Nanded railway line will be completed within a year | वर्षभरात वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम जाणार पूर्णत्वास

वर्षभरात वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम जाणार पूर्णत्वास

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धा ते यवतमाळ पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण , मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर व कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर, वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी एक हजार २७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वर्धा ते कळंबकरिता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला असून राज्य सरकारकडे निधी प्रलंबित आहे. वर्धा-नांदेड रेल्वेचे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.
वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची होती. पैकी ०८.३७ हेक्टर जमीन संपादित केलेली असून सालोड, हिरापूर, देवळी, बाभूळगाव, भिडी, शिरपूर, रत्नापूर, सेलसुरा, मेघापूर या गावातील शेतकºयांकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण होईल, अशी माहिती भूसंपादन अधिकारी यांनी दिली.
वर्धा-कळंबदरम्यान १० मोठ्या पुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. तसेच यशोदा नदीवरील व भिडी येथील दोन पुलांचे काम पूर्ण झाले असून वर्धा नदीवरील रेल्वे पुलाचे काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित होते. मात्र, आता आता उर्वरीत कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वर्धा-कळंब दरम्यान स्टेशन इमारत व कार्यालये बांधकामाची निविदा अंतिम झाली. वर्धा-कळंबसाठी स्टाफ क्वार्टर बांधणे, वर्धा-कळंबसाठी आरओबी बांधण्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्ये रेल्वे विभागाचे उपअभियंता कावरे यांनी दिली.

भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नको
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता तत्कालीन खासदार विजय दर्डा यांनी प्रकल्प मंजूर करून प्रकल्पाला गती प्रदान करण्याकरिता प्रयत्न केलेले आहे तसेच तसेच वर्धा-यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण व्हावा म्हणून २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्याकरिता प्रलंबित कामांना गती द्यावी तसेच वर्धा-यवतमाळ मध्ये रेल्वेलाईनकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भूसंपादन केल्यानतर त्वरित मोबदला देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यानां खासदार रामदास तडस यांनी दिल्या.

Web Title: Work on Wardha-Nanded railway line will be completed within a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.