महिला सक्षमीकरणाचे काम घराघरातून व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:20 PM2018-03-25T22:20:24+5:302018-03-25T22:20:24+5:30

आज स्त्री चुल आणि मुल या पर्यंतच सीमित राहली नाही. यशाचे एकएक शिखर ती पदाक्रांता करीत आहे;पण पुरुष प्रदान संस्कृती आम्ही आजही बाजुला सारली नाही.

Work of women empowerment can be done from home | महिला सक्षमीकरणाचे काम घराघरातून व्हावे

महिला सक्षमीकरणाचे काम घराघरातून व्हावे

googlenewsNext
ठळक मुद्देअजय गुल्हाणे : मार्गदर्शन मेळावा; योजनांची दिली माहिती

आॅनलाईन लोकमत
तळेगाव(श्या.पं.) : आज स्त्री चुल आणि मुल या पर्यंतच सीमित राहली नाही. यशाचे एकएक शिखर ती पदाक्रांता करीत आहे;पण पुरुष प्रदान संस्कृती आम्ही आजही बाजुला सारली नाही. महिलांना सक्षम करण्याचे काम घराघरातून होणे गरजेचे आहे. महिलांच्या प्रयत्नानेच देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.
ग्रामीण क्षेत्रातील महिला व युवतींना सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून त्यांना स्वयंरोजगार व प्रशिक्षण दिले जात आहे. परिणामस्वरुप जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. याच धर्तीवर जि.प. महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आर्वी(ग्रा.), आष्टी(ग्रा.), कारंजा(घा.)(ग्रा.), अंतर्गत आर्वी-कारंजा-आष्टी मतदार संघातील महिला व किशोरींकरिता येथील लक्ष्मी मंगल सभागृह येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे होते. व्यासपीठावर जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण सभापती निता गजाम, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, आर्वी पं.स.चे सभापती शिला पवार, आष्टी पं.स. सभापती निता होले, कारंजा पं.स. सभापती मंगेश खवशी, आर्वी न.प.चे उपाध्यक्ष उषा सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कडू, देवकुमार कांबळे, गटविकास अधिकारी व्ही. डी. धापके, ए. बी. मरमळ, रेवता धोटे, जि.प. सदस्य अंकिता होले, सुचिता कदम, छाया घोडीले, धर्मेद्र राऊत, हेमलता भगत, रंजना टिपले आदींची उपस्थिती होती.
गुल्हाणे पुढे म्हणाले, महिलांना सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्त्री ही स्वता:च्या पायावर सक्षमपणे उभी राहावी यासाठी नुकतीच अस्मिता योजना सरकारने सुरू केली आहे. किशोरी व महिलांना सॅनेटरी नॅपकीन सोबतच बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. शासकीय योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
माजी आमदार दादाराव केचे यांनी स्वयंरोजगार आज महत्त्वाचा आहे. अनेकांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:सह इतरांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. महिला व बालकल्याण विभागाने या प्रकाराचे शिबिर नियमित घ्यावे असे म्हणाले. सभापती सोनाली कलोडे व देवकुमार कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या माध्यमातून उपस्थितांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्यकार्यकारी अधिकारी ज्योती कडू यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षिका आसटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Work of women empowerment can be done from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.