लघुशंकेला गेलेल्या कामगाराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:00 PM2021-05-02T19:00:51+5:302021-05-02T19:01:46+5:30

A worker died due to electric shock : पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. 

A worker who went to urinate died due to electric shock | लघुशंकेला गेलेल्या कामगाराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू

लघुशंकेला गेलेल्या कामगाराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू

Next
ठळक मुद्देमृतक अनिल निवृत्ती कानाडे हा मॉडेल शालेसमोरील शिव ट्रेडर्स येथे काम करत होता.

देऊरवाडा/आर्वी ( वर्धा) - विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आर्वी- पुलगाव मार्गावरील शिव ट्रेडर्स येथे रविवारी सकाळी घडली अनिल निवृत्ती कानाडे  (३९) रा.आसोले नगर असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. 


मृतक अनिल निवृत्ती कानाडे हा मॉडेल शालेसमोरील शिव ट्रेडर्स येथे काम करत होता. हे शिव ट्रेडर्स अब्देअली बोहरा यांनी किरायाने घेतले होते. लोकडाऊनमुळे ७ ते ११ दुकानाची वेळ असल्याने दुकान मालक बोहरा हे पहाटे अनिलला आणावयास त्याचे घरी गेले होते, असे मृतकाचे भावाने सांगितले. 

तेथे राहत्या झोपडीच्या बाजूला बाथरूममध्ये लघवीला गेला असताना टिनाच्या आतून इलेक्ट्रिकच्या गेलेल्या वायराला कट असल्यामुळे आणि ही वायर टिनाला टच असल्याने त्याचा हात चालू करंटच्या केबलच्या टीनाला लागून जागीच मृत्यू झाला महत्वाची बाब म्हणजे मध्यरात्रीनंतर पाऊस आल्याने टिन पत्रे ओले झाले होते. त्याच्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे. उत्तरीय तपासणीनंतर उपजिल्हा रुग्णालयातुन मृतदेह नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आला असून स्थानिक मोक्षधामात त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

 

Web Title: A worker who went to urinate died due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.