क्रांतीदिनी शेतकऱ्यांसह कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:47 PM2018-08-09T23:47:21+5:302018-08-09T23:48:12+5:30

क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल मंदीर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला. मोर्चा जिल्हाकचेरीसमोर पोहाचताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले.

Workers' algarg with revolutionaries | क्रांतीदिनी शेतकऱ्यांसह कामगारांचा एल्गार

क्रांतीदिनी शेतकऱ्यांसह कामगारांचा एल्गार

Next
ठळक मुद्देमोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल मंदीर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला. मोर्चा जिल्हाकचेरीसमोर पोहाचताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.
शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा करून त्यांना पेन्शन देण्यात यावी. शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्यात यावे. महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही देशी, विदेशी व गावठी दारू ठिकठिकाणी सहज मिळते. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. कामगार विरोधी ठरणारे कायदे रद्द करण्यात यावे. असंघटीत कामगारांना दरमहा १८ हजार रूपये किमान वेतन देण्यात यावे. स्वामीनाथन आयोग शेतकºयांसाठी हितकारक असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. हवालदिल झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. अंगणवाडी-आशा-गटप्रवर्तक शालेय पोषण आहार महिला कामगारांचे प्रलंबित प्रश्न त्वरित निकाल काढण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरण्यात आल्या होत्या.
शिवाय सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. मोर्चाचे नेतृत्त्व नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, सुनील घिमे, रंजना सावरकर, अर्चना मोकाशी, अलका जराते, अर्चना घुगरे, मिनाक्षी गायकवाड, अनिल चव्हाण, जगन चांभारे, जानराव नागमोते, सुंदरा देशमुख, अनिता राऊत यांनी केले. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिला पानकावसे, रामभाऊ ठावरी, विलास नागदेवते, शुभांगी कलोडे, निलीमा घाटे, प्रमिला वानखेडे, छबु चहांदे, नंदा गोंडाने, संदीप मोरे, राजू घोडे, राहुल खंडाळकर, प्रिया वडेकर, मोनली मेश्राम, प्रतीक्षा हाडके, दुर्गा काकडे, निर्मला वाघ, संध्या संभे, आशा ईखार, रवींद्र हटकर, कमलाकर मरघडे, भूमिकांत मोहर्ले, पांडुरंग राऊत, रमेश शेळके, रामेश्वर कुनघटकर, संजय भगत, रामराव कावळे यांच्यासह सिटू, किसान सभा, जनवादी महिला संघटना, शेतमजूर युनियन, अंगणवाडी कर्मचारी सेविका-मदतनिस कर्मचारी संघटना, आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, जनरल लेबर युनियन, स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडिया, ईमारत बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Workers' algarg with revolutionaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.