योग्य मोबदल्यासाठी कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:39 PM2019-06-16T23:39:17+5:302019-06-16T23:41:17+5:30

औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन केले. कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. इतकेच नव्हे तर कामगारविरोधी धोरण राबविल्या जात असल्याने कंपनी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Workers' elig | योग्य मोबदल्यासाठी कामगारांचा एल्गार

योग्य मोबदल्यासाठी कामगारांचा एल्गार

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे आंदोलन : गॅमन इंडिया कंपनी प्रशासनाविरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन केले. कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. इतकेच नव्हे तर कामगारविरोधी धोरण राबविल्या जात असल्याने कंपनी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनंता देशमुख यांच्या नेतृत्त्वात कामगारांनी हे आंदोलन केले. कामगारांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करून आपल्या न्याय्य मागण्या कंपनी प्रशसनातील अधिकाऱ्यांना पटवून दिल्या. येथील औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कांना डावलुन त्यांच्यावर कारखाना प्रशासनाच्यावतीने मनमानी केली जात होती. अरेरावी व मनमर्जी काम करण्याची पद्धत अवलंबिली जात होती. मागील तीन वर्षांपासून ठेकेदार पद्धतीत काम करूनही वेतनवाढ न करता प्रतिदिवस ३३६ रूपये देऊन कामगारांची बोळवण करण्यात येत होती. तसेच इतर सवलतीपासून कामगारांना वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वेतन पावती मिळत नसल्याने नेमके वेतन मिळते तरी किती याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ओटी दरम्यान जेवणाचा डबा व ओटीचे अतिरिक्त पैसे मिळाल्याची तसेच सिक्युरीटीतील वानखेडे व कांबळे यांच्याकडून नेहमी अपमानित केले जात असल्याची कामगारांची तक्रार होती. कामगारांना प्रतिदिवस ४५० रूपये याप्रमाणे पगार देण्यात यावा तसेच दरवर्षी पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. दुपारी २ नंतर कंपनी प्रशासनाच्यावतीने वैभव देशमुख, अजय भाके, तसेच शिवसेनेच्यावतीने जिल्हा उपप्रमुख अनंत देशमुख, तालुकाप्रमुख विलास निवल, शहर प्रमुख महेश जोशी व मुन्ना तिडके यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Workers' elig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.