प्रवेश करताच उमेदवारी देण्याला कार्यकर्त्यांचा विरोध
By admin | Published: July 24, 2016 12:22 AM2016-07-24T00:22:13+5:302016-07-24T00:22:13+5:30
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाद्वारे संवाद यात्रा काढण्यात आली आहे.
भाजपची संवाद यात्रा : पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर
हिंगणघाट : नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाद्वारे संवाद यात्रा काढण्यात आली आहे. यात संत कंवरराम भवनात कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून विविध सूचना मागविल्या. यात पक्षात प्रवेश करताच उमेदवारी दिली जात असल्याचा कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने तर अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, सुनील गफाट, अतुल तराळे, नितीन मडावी, बाळा जगताप, दिनेश सुरकार, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, गिरधर राठी, बिसमिल्ला खान आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांनी संवाद साधून मनोगत व्यक्त केले. आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांची उमेदवारी देण्यापूर्वी जनतेतून सर्वेक्षण घेण्यात यावे, उमेदवारांची प्रामाणिकता, पक्षनिष्ठा व त्यांचे सामाजिक कार्य या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊनच पक्षातर्फे उमेदवारी देण्यात यावी, असा बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सूर होता. शिवाय ऐनवेळी पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी देण्याच्या धोरणाचा कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. याला सरचिटणीस किशोर दिघे यांनीही दुजोरा देत ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याची ग्वाही दिली.
बकाने यांनी नगरपालिका निवडणुकीकरिता सज्ज राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन शहर सरचिटणीस छाया सातपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार आखाडे यांनी मानले. यावेळी जिल्हा चिटणीस प्रा. किरण वैद्य, रमेश टपाले, अविनाश आईटलावार, शंकर एंकेश्वर, अॅड. रवी मद्दलवार, बळवंत वाघे, सतीश ढगे, धिरज इंदूरकर, अंकुश ठाकूर, आशिष पर्बत, दिनेश वर्मा, कलमाकर, येसनसुरे, नगरसेवक विठ्ठल गुळघाणे, शुभांगी डोंगरे, शारदा पटेल, मनीष देवळे, नीता धोबे, दिनेश वर्मा, प्रदीप जोशी, राकेश शर्मा, डॉ. उमेश तुळसकर, धिरज इंदूरकर, गणेश उगे, अनीता माळवे, कौसर अंजुम, अर्चना भोयर, वंदना धोंगे, शोभा बैसवारे, वैशाली पालांडे, गीता मेश्राम संगीता मेंढे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)