जिल्ह्यात श्रमदानाचे तुफान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:42 AM2018-04-16T00:42:56+5:302018-04-16T00:42:56+5:30
जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाचे तुफान आल्याचे दिसत आहे. वर्धेत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनाही या कामांत सहभागी होत असल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाचे तुफान आल्याचे दिसत आहे. वर्धेत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनाही या कामांत सहभागी होत असल्याचे दिसत आहे. रविवारी वर्धा शहरातून विविध गावांत होणाऱ्या महाश्रमदानात सहभागी होण्याकरिता वर्धेतून तब्बल ५०० युवक सहभागी झाले होते.
स्पर्धा असलेल्या गावांत या युवकांना पोहोचविण्याकरिता वर्धेतून दोन बसगाड्या रवाना झाल्या होत्या. एक बसगाडी बॅचलर मार्गावरील डॉ. सचिन पावडे यांच्या घरापासून तर दुसरी बसगाडी आर्वी मार्गावरील हनुमान मंदिराजवळून रवाना होत आहे. यात वैद्यकीय जनजागृती मंचाचे पदाधिकारी आणि त्यांच्या आवाहनातून अनेक युवक सहभागी होत आहे. या युवकांकडून नियोजित गावांत जात श्रमदान करीत आहे.
आज बोदड, टेंभरी, परसोडी, बोरी (कोकाटे), सोेडी-हेटी येथे श्रमदान झाले. या श्रमदानात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहभाग घेतला. त्यांनी आर्वी तालुक्यातील बोदड (पोड) येथे दगडी बांध निर्माण केला. येथे त्यांनी स्वत: दगड उचलून बांध बांधण्यास मदत केली. खुद्द जिल्हाधिकारी श्रमदान करीत असल्याचे पाहून गावातील नागरिकांनाही हुरूप येत आहे. यामुळे जिल्ह्यात ही स्पर्धा चांगलीच रंगत असल्याचे दिसत आहे. केवळ स्पर्धेत यशस्वी होण्याची वर्धेतील नागरिकांची इच्छा नसून गावांत संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी याकरिता गावकरी काम करीत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात होत असलेल्या श्रमदानातून पाण्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
व्हीजेएमकडून गावकºयांना टोपले, फावडे
या स्पर्धेकरिता महाश्रमदान साहित्याची कमतरता जाणवू नये म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने गावकºयांना टोपले, फावडे भेट देत आहे. या साहित्याचा लाभ गावकºयांना होत आहे.