पाणीदार गावासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:00 AM2018-02-11T00:00:30+5:302018-02-11T00:00:42+5:30

पाणी फाऊंडेशनतर्फे यावर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेत ७२ गावे सहभागी होत आहेत. या स्पर्धेची कार्यप्रणाली व अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Workers training for a watery village | पाणीदार गावासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

पाणीदार गावासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील ४५ सदस्य रवाना : ७२ गावातील लोक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : पाणी फाऊंडेशनतर्फे यावर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेत ७२ गावे सहभागी होत आहेत. या स्पर्धेची कार्यप्रणाली व अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पाच या प्रमाणे नऊ गावांच्या एकूण ४५ युवकांना प्रशिक्षणासाठी पोरगव्हाणला पाठविण्यात आले आहे.
तहसीलदार सचिन कुमावत यांनी पं.स. सभापती मंगेश खवशी, कृषी अधिकारी अनिल आदेवार व प्रदीप ताटे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून पोरगव्हाणला जाणाऱ्या ४५ प्रशिक्षणार्थ्यांना रवाना केले. कारंजा तालुक्यातील १२० गावापैकी ३० टक्के गावे ड्राय झोन मध्ये येतात. या ड्राय झोन मधील गावांतील भूजल पातळी वाढविण्यासाठी अमीर खान यांनी सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा निश्चित उपयुक्त पडणार आहे.
२२ व २३ डिसेबरला पं.स. सभागृहात वॉटर कप प्रदर्शनाचे आयोजन करून योजनेबद्दल सर्वकष माहिती देण्यात आली.
विविध गावांचे सरपंच व ग्रामसेवकांमार्फत गावातील समाजसेवी युवकांना या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात आले. पाणी फाऊंडेशनने कारंजा तालुका समन्वयक अनिल पेंंदाम, शिल्पा अडसड आणि चंद्रशेखर यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नामुळे तालुक्यात वॉटर कप स्पर्धा चांगलीच जोर धरत आहे. या स्पर्धेकरिता सध्या एकूण ४५ गावांनी आपली संमती दाखविली असून रितसर नोंदणी केली आहे. नोंदणीकृत गावातील युवकांना टप्प्या टप्प्याने प्रशिक्षणाला पाठविले जाणार आहे. पाणलोट विकास आणि जलसंधारणाचे कामाचे प्रशिक्षण पाणी फाऊंउेशनच्या खर्चाने दिले जाणार आहे. उरलेल्या ६३ गावातील युवकांना प्रशिक्षित केले जाईल. ज्या गावातील सरपंचानी या स्पर्धेत भाग घेतला नसेल. त्या गावांना १० फेब्रुवारीपर्यंत नावे नोंदविण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी होवून यशस्वी होण्याकरिता उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यरत आहेत. शिवाय गावकऱ्यांकडून या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नागरिकही उत्सूक असल्याचे दिसून आले.
पहिल्या चमुचे स्वागत व प्रस्थान
कारंजा (घा.) - नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज येथे पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी कोरेगाव ता. वरुड येथे रवाना झालेल्या कारंजा तालुक्यातील पहिल्या प्रशिक्षणार्थी चमूचे महाविद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले. अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना देखील करण्यात आले. कारंजा तालुक्याची पाणी फाउंडेशन स्पर्धा भाग तीन याकरिता निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील निवडलेल्या गावागावातून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी कोरेगाव या गावात पाठविण्यात आले. प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढविण्याकरिता महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षार्थींना पुष्प देऊन स्वागत केले. चहापाणी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात. या प्रशिक्षणार्थींमध्ये महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. याप्रसंगी पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक अशोक बगाडे, तालुका समन्वयक अनिल पेंदाम, चंद्रशेखर डोईफोडे, शिल्पा अरसड उपस्थित होते. ‘अन्न गुडगुडे, नाद गुडगुडे’ च्या घोषणा देत महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला होता. सर्वांनी आपापले गाव पाणीदार करण्याचा संकल्प याप्रसंगी केला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय धनवटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. कलाम, कला विभाग प्रमुख डॉ. राठोड, डॉ. सोनटक्के, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Workers training for a watery village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.