‘गाळमुक्त धरणा’ची कामे केवळ ४.८० टक्केच पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:18 PM2019-05-25T22:18:36+5:302019-05-25T22:18:59+5:30
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील गाव तलाव गाळमुक्त करण्याचे काम सध्या ४०.५८ टक्के पूर्ण झाले आहे. तर याच तालुक्यातील लघुसिंचन तलाव धामणगावचे काम ३.३३ टक्के झाले आहे. साठवण तलाव आर्वी (छ.) ५५.५६ टक्के झाले. तर लघुसिंचन तलाव सेलू (मु.), गाव तलाव चिकमोह, पाझर तलाव उमरी (येंडे), साठवण तलाव कानगाव व साठवण तलाव भैय्यापूरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. शिवाय समुद्रपूर तालुक्यातील गावतलाव साखरा २३.३३ टक्के, गाव तलाव पिंपळगाव ७६.६७ टक्के, साठवण तलाव गिरड-१०.० टक्के, गावतलाव समुद्रपूर ५.५० टक्के, लघुसिंचन तलाव नंदोरी ६.०० टक्के, पाझर तलाव मंगरूळ ३.३३ टक्के काम झाले आहे. तर साठवण तलाव पिंपरी, साठवण तलाव गिरड-२, गावतलाव दसोडा-२, गावतलाव कानकाटी येथून गाळ काढण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. देवळी तालुक्यातील गाव तलाव कोळोणा (चो.) ६०.०० टक्के, पाझर तलाव कोल्हापूर (राव) १४.०० टक्के काम झाले आहे. तर पाझर तलाव गौळ येथून मुठभरही गाळ काढण्यात आलेला नाही.
आष्टी तालुक्यातील लघुसिंचन तलाव पांढुर्णा, पाझर तलाव तळेगाव (श्या.पंत.), साठवण तलाव इंदरमारी येथून एक मिटरही गाळ काढण्यात आलेला नाही. आर्वी तालुक्यातील पाझर तलाव आजनगाव ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर पाझरतलाव सालधरा, पाझर तलाव पांझरा (बो.), लघुसिंचन तलाव काकडधरा, लघुसिंचन तलाव गौरखेडा येथून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. लघुसिंचन तलाव आजनादेवी ३० टक्के, लघुसिंचन तलाव ठाणेगाव २ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर लघुसिंचन तलाव पिपरी, पाझर तलाव आगरगाव, गावतलाव बांगडापूर, लघुसिंचन तलाव सेलगाव, लघुसिंचन तलाव सुसुंद्रा, साठवण तलाव बोंदरठाणा येथून गाळ काढण्यात आलेला नाही.
केळझरच्या दोन तलावातून काढला १०० टक्के गाळ
सेलू तालुक्यातील गाव तलाव केळझर व गणेश तलाव केळझर येथून १०० टक्के गाळ काढण्यात आला आहे. असे असले तरी गाव तलाव सोंडी, ल.पा. तलाव पांझरा बोधली, ल.पा. तलाव कुºहा, ल.पा. तलाव दहेगाव (गोंडी), ल.पा. तलाव आष्टी, सेलू तालुक्यातील मदन प्रकल्प, समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प, कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प, आर्वी तालुक्यातील सुकळी ल.पा. प्रकल्पातून मुठभरली गाळ काढण्यात आलेला नाही.