जगाला युद्ध नकोच; बुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:53 PM2018-05-09T23:53:27+5:302018-05-09T23:53:37+5:30

महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.

The world does not want war; Buddha wind | जगाला युद्ध नकोच; बुद्ध हवा

जगाला युद्ध नकोच; बुद्ध हवा

googlenewsNext
ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
भिडी : महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष अनिल जवादे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भदन्त राजरत्न, विशाल मानकर, पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, मुकुंद नाखले, सुनील ढाले यांची उपस्थिती होती.
राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले. जगातला मानवतावादी धम्म दिला. जो मानवा मानवामध्ये भेद न करता मानवा मानवाला जोडतो. त्यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला नागाच्या नागभूमित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. तो कल्याणाचा धम्म प्रत्येक बौद्धांनी आत्मसात करून धम्माचा प्रचाार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. कारण धम्म कितीही चांगला असेल; पण त्याचा प्रचार आणि प्रसार करणारेच नसतील तर तो धम्म नष्ट पण होवू शकतो. यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करावे, असे त्यांनी सांगितले.
अनिल जवादे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या मातृसंघटना भारतीय बौद्ध महासभेचे सभासद होवून धम्म चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन केले. तर भदन्त राजरत्न यांनी बुद्धाचा धम्म आधी, मध्य आणि अंतही कल्याणकारी आहे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात चंद्रशेखर भुजाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद नाखले यांनी केले. संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार चंद्रशेखर भुजाडे यांनी मानले. त्यानंतर आशीषकुमार मून व वैशाली कांबळे यांचा बुद्ध व भीम गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत संयोजक जयंत फुलझेले, नारायण चिकराम, गौरव डबले, नितेश मून, ज्ञानोबा थूल, दिलीप शेंडे, योगिराज बागेश्वर, सुधाकर आत्राम, रामभाऊ निरगुडे, सुरज मून, प्रशिल तेलतुंंबडे, प्रशिल पाटील, चंदू ढाले, रमाई महिला मंडळ भिडी आदींनी सहकार्य केले.

Web Title: The world does not want war; Buddha wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.