वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा
By admin | Published: March 16, 2017 12:37 AM2017-03-16T00:37:29+5:302017-03-16T00:37:29+5:30
जय शिवाजी..जय भवानी.. च्या जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. बुधवारी छत्रपतींची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.
छत्रपतींचा जयजयकार : मिरवणुकांसह कार्यक्रम
वर्धा : जय शिवाजी..जय भवानी.. च्या जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. बुधवारी छत्रपतींची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.
शिवाराय जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील विविध भागात शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुख्य मार्गावर रोषणाई करण्यात आली. शिवसेना शहर शाखेद्वारे भगव्या पताका लावून मुख्य मार्गावर सजावट करण्यात आली. बजाज चौकात मनसेद्वारे कार्यक्रम घेण्यात आला. कृष्णनगर येथील संत गाडगेबाबा मठ प्रांगणात ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे मॅनेजमेंट कौशल्य’ विषयावर प्रा. सूमन टेकाडे यांचे व्याख्यान झाले. ढोलताशा पथकाने सलामी दिली. जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी)
सायंकाळी शहरात शिवसेनेद्वारे शोभायात्रा काढण्यात आली. यात विविध झाक्यांचा समावेश होता. समोर भगवी पतका घेतलेला अश्व, बँड पथक व शिवभक्तांची गर्दी. या गर्दीत शिवराय, माँ साहेब जिजाऊ व मावळ्यांची वेषभूषा केलेले युवक आकर्षण ठरले. शोभायात्रा शास्त्री चौकातून निघून मुख्य मार्गाने शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली. मनसेद्वारेही शोभायात्रा काढण्यात आली. रोषणाई व सजावट आकर्षण ठरली.