अस्सल मातीत कुस्तीच्या डावपेचाची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:34 AM2017-10-23T00:34:06+5:302017-10-23T00:34:19+5:30

येथील श्रीराम मंदिर देवस्थानच्या हनुमान व्यायाम शाळेच्यावतीने गत १०५ वर्षांपासून सुरू असलेल्या गौरवशाली पंरपरेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या मैदानावर आम कुस्ती दंगल पार पडली.

Wrestling tactics in genuine soils | अस्सल मातीत कुस्तीच्या डावपेचाची दंगल

अस्सल मातीत कुस्तीच्या डावपेचाची दंगल

Next
ठळक मुद्देस्थानिक पोलीस ठाण्याच्या मैदानावर आम कुस्ती दंगल पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : येथील श्रीराम मंदिर देवस्थानच्या हनुमान व्यायाम शाळेच्यावतीने गत १०५ वर्षांपासून सुरू असलेल्या गौरवशाली पंरपरेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या मैदानावर आम कुस्ती दंगल पार पडली. यामध्ये ८९ पहेलवानांनी सहभाग घेतला होता. यावेळी कुस्तीगिरांनी अस्सल मातीतील डावपेच प्रतिस्पर्धीवर कसरत रसिकांची मने जिंकली.
कुस्तीच्या उद्घाटनप्रसंगी ठाणेदार जावेद शेख, गुरूदेव सेवा मंडळाचे बबन दाभने, वसंत पर्बत, इंद्रपाल आटे, रामचंद्र भिसेकर, गजानन गारघाटे, विलास नवघरे, प्रभाकर दाते आदींची उपस्थिती होती. गिरड येथील आम दंगलीच्या परंपरेने शेतकोत्तरकडे वाटचाल केली आहे. दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजेच्या पर्वावर होणारी कुस्तीची दंगल जिल्ह्याला परिचित आहे. १९९२ मध्ये श्रीराम देवस्थानचे मठाधिपती सीताराम महाराजांनी ही परंपरा सुरू केली होती. ती अद्यापही जोपासली जात आहे असे यावेळी सांगण्यात आले.
यंदाच्या कुस्तीच्या दंगालीत नागपूर जिल्ह्यातील सीर्सी, चिखलापार, नांद, ताविभिवी, भगवानपूर, उमरेड, पिपरा, शेडेश्वर, आमघाट तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमडी, खांबाडा, खेक, खापरी, वडाळा, केसलाबोडी आदी गावातील भाग घेतला. कुस्तीस्पर्धेच्या सुरुवातीला गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन विष्णू ब्राह्मणवाडे यांनी केले. पंच म्हणून गोपीकृष्ण थुटे, मधुकर मडावी, अतुल कोयचाडे यांनी काम पाहिले.

Web Title: Wrestling tactics in genuine soils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.