हरभºयाच्या पेºयात यंदा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:04 AM2017-10-28T01:04:08+5:302017-10-28T01:04:21+5:30
खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. रबी हंगामात यंदा हरभरा पिकाची लागवड ४४ हजार १०० हेक्टरवर होणार असून त्याच्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र १६ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पाऊस अनियमित स्वरूपात झाला. तसेच दिवाळीच्या सुरूवातीला अचानक झालेल्या पावसाने सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्ह्यातील अनेक धरणे अत्यल्प पावसामुळे भरली नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकºयांनी रबी पिकाच्या पेरणीसाठी कंबर कसली आहे. यंदा ६६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिके घेतली जाणार आहेत. त्यात ज्वारी ८२५ हेक्टर, गहू १६ हजार २५० हेक्टर, हरभरा ४४ हजार १०० हेक्टर, करडई १०० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, मोहरी २०० हेक्टर, सूर्यफुल १५०, जवस ५० हेक्टर, मका ५०० व उन्हाळी भूईमुंगाची लागवड ४ हजार हेक्टरवर होणार असल्याचे सांगण्यात आले. गत वर्षी ८० हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक भागात रबी पिकासाठी धरणाचे पाणी सोडले जाण्याची शक्यता नसल्याने रबीचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने घसरले आहे. इतकेच नव्हे तर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप पिकाच्या मशागतीच्या कामातही अडचण येत आहे. गव्हासाठी तयार करण्यात येत असलेल्या कठाणाला पाणी देणे भारनियमनामुळे अडचणीचे जात आहे. शेतकºयाला मध्यरात्री जाऊन पाणी ओलण्याची वेळ आली आहे.
यावर्षी सेलू तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ३७० हेक्टरवर रबी पीक घेतली जाणार आहेत. समुद्रपूर तालुक्यात ११ हजार १२२ हेक्टरवर,वर्धा तालुक्यात ९१३५, आष्टी तालुक्यात ८९३०, देवळी ७०२५, आर्वी तालुक्यात ५१५५, हिंगणघाट तालुक्यात ६६४५, कारंजा तालुक्यात ६८९३ हेक्टर क्षेत्रावर रबी पीक घेण्यात येणार आहेत.