यंदा केवळ २५ टक्केच पोपट रामनगरात परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:15+5:30
वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार आहे. एरव्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या भागात मोठ्या संख्येने पोपट मुक्कामी यायचे. परंतु, यंदाच्या वर्षी केवळ २५ टक्केच पोपट आलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रामनगर भागातील मगनवाडी परिसरातील डेरेदार वृक्षांची विकासाच्या नावावर कत्तल करण्यात आली. याचा परिणाम तेथे मुक्कामी येणाऱ्या पोपटांवर झाला असून यंदा केवळ २५ टक्केच पोपट परतल्याची नोंद एका ज्येष्ठ वन्यजीव प्रेमीने घेतली आहे. विकासाच्या नावावर होणारी वृक्ष कत्तल वेळीच थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे अन्यथा सुमारे पाच दशकांची परंपरा खंडित होईल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार आहे. एरव्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या भागात मोठ्या संख्येने पोपट मुक्कामी यायचे. परंतु, यंदाच्या वर्षी केवळ २५ टक्केच पोपट आलेत. ७५ टक्के पोपट यंदा परत का आले नाही, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना तर निर्माण झाली नाही आदी सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.
तीन वर्षांपासून करीत आहेत सखोल अध्ययन
जेष्ठ वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा हे मागील तीन वर्षांपासून सदर विषयाचे अध्ययन करीत आहेत. शहरात होत असलेली अवैध वृक्षतोड हा प्रकार सध्या मगनवाडी भागात मुक्कामी येणाºया पोपटांचे तेथील अस्थित्त्वच संपविणारा ठरत असल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या अध्ययनात पुढे आले आहे. एमगिरी आणि मगनवाडी येथील पोपटांचे अस्थित्त्व कायम रहावे, यासाठी शासकीय स्तरावर विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.
रामनगर भागातील एमगिरी व मगनवाडी परिसरातील जैवविविधता दिवसेंदिवस नष्ट होत आहे. याचाच परिणाम तेथे मुक्कामी येणाºया पोपटांच्या संख्येवर झाला असल्याचे आतापर्यंतच्या माझ्या अध्ययनात पुढे आले आहे. जिल्ह्यातील पक्षीमित्र व जिल्हा प्रशासनाने एकत्र येत वेळीच योग्य पाऊल उचलले पाहिजे.
- कौशल मिश्रा, ज्येष्ठ वन्यजीव प्रेमी, वर्धा.