पुरूषी मानसिकतेवर काम करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:55 PM2018-03-14T22:55:31+5:302018-03-14T22:55:31+5:30

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, संशोधन इत्यादी क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महिलांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

You must work on men's mentality | पुरूषी मानसिकतेवर काम करणे गरजेचे

पुरूषी मानसिकतेवर काम करणे गरजेचे

Next
ठळक मुद्देमाधुरी झाडे : ‘विविध क्षेत्रात महिलांची कामगिरी’ विषयावर अभ्यास वर्ग

ऑनलाईन लोकमत
वर्धा : शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, संशोधन इत्यादी क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महिलांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आजही त्या करीत आहे. असे असताना घर व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात येते. तिचा शारीरिक व मानसिक, लैगिंक, आर्थिक बाबतीत छळ होतो. हे चित्र बदलायचे असेल तर पुरूषी मानसिकतेवर काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिस वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रमुख प्रा. डॉ. माधुरी झाडे यांनी केले.
स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिरात महाराष्ट्र अंनिस, राष्ट्र सेवा दल व अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ व्या अभ्यास वर्गात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रात महिलांची कामगिरी या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. सोमालिया देशातील वारीस विल्मा रूलाल, डॉ लिली मलाला सुसुफ, मरीया मरीयन, सिमंथ बुआई, मर्लिन मन्रो या आंतराष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या महिलांची कामगिरी विशद केली. राष्ट्रीय पातळीवर सावित्रीबाई फुले, मॉ. जिजाऊ, मेधा पाटकर, अरूनिमा सिन्हा, नजूबाई गावित, किरण बेदी, सुनिता विल्सम, कल्पना चावला, सुनिता बाला, जोत्स्ना रासम आदी महिलांच्या कार्याचाही आढावा घेतला. महिला अबला, कमजोर नसून त्यांना घरच्यांची समाजाची साथ मिळाली तर त्यांही अतुलनिय कामगिरी करू शकतात. यासाठी प्रत्येक पुरूषाने पुरूषी अहंकार बाजूला सारून स्त्रियांना प्रत्येक पातळीवर समान वागणूक देण्याचे आवाहनही झाडे यांनी केले.
अरूण चवडे, राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, गोवर्धन टेभुर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन भीमसेन गोटे यांनी केले. प्रास्ताविक सुनिल ढाले, परिचय गजेंद्र सुरकार तर आभार नरेंद्र कांबळे यांनी मानले. संजय भगत, सारीका डेहनकर, अजय मोहोड, भरत कोकावार, किशोर जगताप, हरिष पेठकर उपस्थित होते.

Web Title: You must work on men's mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.