अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 03:10 PM2017-08-23T15:10:52+5:302017-08-23T15:19:00+5:30

वर्ध्यामध्ये एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Youth killed in suspicion of unethical relation, police detained for three | अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next

वर्धा, दि. 23 - कुटुंबातील नातेवाईकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तीन जणांनी एका तरुणाला कु-हाड व लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वडनेरजवळील काचनगाव येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  विलास संजय आष्टणकर (वय २५ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना वडनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काचनगाव येथील विनोद संतोष डफ, अमोल संतोष डफ व संतोष रामभाऊ डफ यांनी विलास आष्टणकर याच्याशी वाद घातल त्याला जबर मारहाण केली. तिन्ही आरोपींनी काठ्या व कु-हाडीचा वापर करत विलासच्या डोक्यावर, पोटावर, मानेवर व छातीवर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन वासेकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.  यावेळी त्यांनी विलासचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनोद संतोष डफ, अमोल संतोष डफ व संतोष रामभाऊ डफ यांच्याविरुद्ध मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Youth killed in suspicion of unethical relation, police detained for three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा