चिनी वस्तूंची होळी करून नोंदविला तरुणांनी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:09 AM2017-08-12T02:09:21+5:302017-08-12T02:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सणासुदीच्या दिवसात नागरिकांकडून चिनी बनावटीच्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. चीनसाठी भारत हा मोठी बाजारपेठ आहे. सद्या भारत चीन संबधात तणाव निर्माण झाला आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारने चीन बाबत ठोस भुमिका घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात तरुण-तरुणींनी स्थानिक शिवाजी चौकात चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी केली.
आंदोलनादरम्यान तरूण- तरूणींनी चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी करून आपला रोष व्यक्त केला. चीन हा देश भारताला युद्ध करण्यासाठी परिस्थिती निर्माण करीत आहे. त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणाम चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी केंद्र सरकार योग्य पाऊल उचलावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. तरुण-तरूणींनी जोरदार नारेबाजी करून चीनच्या भारत विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, पुजा कोकाटे, शीतल ऐकोनकार, नेहा वैरागडे, वैशाली खेकारे, प्रतीक्षा गुजर, अनु वांदिले यांच्यासह मोठ्या संख्येने युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.