तरुणांनी राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:30+5:30

पुलगाव येथील सिएडी कॅम्पमध्ये बुद्ध विहार समितीव्दारा विहाराच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर एस.एस. बालाजी होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, मोहन अग्रवाल, इमरान राही, डेप्टी कमांडंट परमविर सिंग, डॉ. सुरेंद्र नितनवरे, फारूख धामियॉ, पी.के. रामटेके, ए. मोटवानी यांची उपस्थिती होती.

Youth should participate in nation building activities | तरुणांनी राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी व्हावे

तरुणांनी राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी व्हावे

Next
ठळक मुद्देखासदार : सीएडी कॅम्पमध्ये बौद्ध धम्म मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : वर्तमानात घडणाऱ्या सर्व हिंसाचाराच्या घटना निश्चित माणुसकीला कलंक लावणाºया घटना आहे. माणसातील माणूसकीला स्मरून, स्वार्थ बाजूला ठेऊन राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देण गरजेचे आहे. हिंसाचार माणूसकीवर कलंक असून भगवान गौतम बद्धांंचा अहिंसेचा मार्ग पत्करून वाट चुकलेल्या तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होत राष्ट्र निर्माण कार्यात अग्रेसर व्हावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
पुलगाव येथील सिएडी कॅम्पमध्ये बुद्ध विहार समितीव्दारा विहाराच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर एस.एस. बालाजी होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, मोहन अग्रवाल, इमरान राही, डेप्टी कमांडंट परमविर सिंग, डॉ. सुरेंद्र नितनवरे, फारूख धामियॉ, पी.के. रामटेके, ए. मोटवानी यांची उपस्थिती होती. यावेळी ब्रिगेडीयर बालाजी म्हणाले की, भगवान बौद्धाच्या अहिंसेच्या शास्त्राने जगातील कोणतेही युद्ध जिंकू शकतात. एवढेचे नव्हेतर संपूर्ण विश्वात शांती निर्माण करू शकतात. असे त्यांनी सांगितले. डॉ. ओम्बासे यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून घेणाºया या देशातील नागरिकांनी स्वातंत्र्याची फळे सर्वसामान्य दलित-पीडितांना मिळावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. यावेळी इमरान राही, मोहन अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पी.के. रामटेके यांनी केले. संचालन रजनी जीवने तर आभार नितीन धनमोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील मुन, प्रवीण माटे, धनपाल रामटेके, अनिल गावंडे, रजनीकांत डोंगरे, राहुल घंगारे, प्रदीप कांबळे, नितीन सिदुरकर आदींसह सी.ए.डी. कॅम्पच्या कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी सहकार्य केले.

Web Title: Youth should participate in nation building activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.