युवकाची निर्र्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:12 PM2019-02-14T22:12:16+5:302019-02-14T22:12:46+5:30

येथील सिंदी ते भोसा मार्गावरील कॅनलच्या पुलावर युवकाची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

Youthful murder | युवकाची निर्र्घृण हत्या

युवकाची निर्र्घृण हत्या

Next
ठळक मुद्देएकास घेतले ताब्यात : सिंदी ते भोसा मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : येथील सिंदी ते भोसा मार्गावरील कॅनलच्या पुलावर युवकाची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल अली तजबर अली (४०) असे मृताचे नाव आहे. तो गावातील मोठी मशिद परिसरात राहात होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सिंदी-भोसा या मार्गाने जात असताना कॅनल पुलावर त्याला अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतकाची दुचाकी पुलाखाली फेकून दिली तसेच त्याचा मृतदेहही बाजुला ओढत नेऊन कॅनलच्या रस्त्यावर टाकला. गुरुवारी सकाळी गौळ व भोसा येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मृतदेह दिसल्याने घटना उघडकीस आली. मृताची ओळख पटल्यानंतर गावातील प्रेमीला डफ यांनी मृताच्या घरी माहिती दिली. मृताच्या परिवाराने घटनास्थळ गाठून टाहो फोडला. मृतकाची पत्नी नजुमन इकबाल अली हिने पोलीस ठाण्यात जाऊन शेजारी राहणाºया सादिक शेख विरुद्ध तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी सादिकला विचारपूस करण्याकरिता ताब्यात घेतले. घटनास्थळी वर्ध्यावरुन ठसेतज्ज्ञ, श्वान पथक व न्यायवैद्यक प्रयोगशाळेची चमू दाखल झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्यासह प्रभारी ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी पाहणी केली. पुढील तपास काटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण भाकडे, मेघरे, जावेद, श्याम इवनाते, गजानन मस्के, अमोल पिंपळकर, सतीश हांडे, प्रकाश मैंद करीत आहेत.

Web Title: Youthful murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.