जिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत
By admin | Published: July 1, 2014 01:37 AM2014-07-01T01:37:22+5:302014-07-01T01:37:22+5:30
भारतीय जनता पार्टीने देवळी तालुक्यातील इंझाळा जि.प.गटात काँग्रेसच्या ताब्यातील जागा बळकावल्यामुळे आता जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सत्ता डळमळली आहे. पक्षीय बलावल आणि माजी
भाजप आता मोठा पक्ष : राजकीय हालचालींना वेग
वर्धा : भारतीय जनता पार्टीने देवळी तालुक्यातील इंझाळा जि.प.गटात काँग्रेसच्या ताब्यातील जागा बळकावल्यामुळे आता जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सत्ता डळमळली आहे. पक्षीय बलावल आणि माजी खासदार दत्ता मघे यांचा भाजपप्रवेश विचारात घेता जि.प.वर भाजपची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषदेच्या ५१ जागांपैकी पूर्वी काँग्रेस आणि भाजपकडे प्रत्येकी सदस्य होते. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसची हात मिळवणी करून केवळ एक मताच्या फरकाने सत्ता काबीज केली होती. मात्र जि.प.च्या इंझाळा गटातील काँग्रेसचे सदस्य विष्णू ताडाम यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने कंबर कसून किशोर मडावी यांना निवडून आणल्यामुळे जि.प.तील पक्षीय बलाबद्दल बदलले. आता भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पक्षीच बलाबल विचारात घेता भाजपची संख्या आता एकने वाढून १८ झाली आहे. काँग्रेसकडे एक जागा गेल्याने आता १७ पेकी १६ सदस्यच राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आठ, स्वभाप तीन, सेना एक व अपक्ष पाच अशी सदस्यसंख्या आहे. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्ञानेश्वर ढगे यांना २६ मते तर भाजप उमेदवाराला २५ मते मिळाली होती. अपक्ष सदस्य गोपाल कालोकर यांनी काँग्रेसला मतदान केल्यामुळे काँग्रेसची सत्ता आली. सत्तेनंतर एक अपक्ष सदस्य काँग्रेसला मिळाल्याने सत्ताधारी गटाची संख्या २७ झाली आहे. सदर सदस्य केव्हाही भाजपगटात मिसळतील अशी शक्यता आहे. इंझाळाची जागा राखण्यास काँग्रेसला अपयश आल्यामुळे आता जि.प.त भाजप व मित्र पक्षांची बाजू वरचढ झाली आहे. या अनुषंगाने काँग्रेसपुढे जि.प.वरील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)