जि.प. सीईओंनी केली १४ वित्त आयोगाच्या कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:36 PM2018-02-03T22:36:15+5:302018-02-03T22:36:28+5:30
गावात १४ व्या वित्त आयोगाची कामे सुरू आहेत. शिवाय पंतप्रधान आवास योजनेत घरांचे बांधकाम करण्यात आले. या कामांची शनिवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी ग्रामपंचायतीला भेट देत पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : गावात १४ व्या वित्त आयोगाची कामे सुरू आहेत. शिवाय पंतप्रधान आवास योजनेत घरांचे बांधकाम करण्यात आले. या कामांची शनिवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी ग्रामपंचायतीला भेट देत पाहणी केली.
जि.प. सीईओ गुंडे यांनी १४ वित्त आयोगाचा निधी खर्च झाला की नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला, त्या लाभार्थ्यांनी घरकुलचे बांधकाम व्यवस्थित केले की नाही आदींची पाहणी करण्याकरिता विजयगोपाल ग्रामपंचायतीला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी कामाची पाहणी करीत ग्रा.पं. ने केलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. शिल्लक असलेला निधी त्वरित मार्गी लावण्याचे आदेशही ग्रामविकास अधिकारी पंकज मनभे यांना दिले. शिवाय नियमानुसार तथा आराखड्यात घेतलेल्या कामांवरच सदर खर्च करण्याचे आदेशही दिलेत.
याप्रसंगी लेखा अधिकारी तथा देवळी पं.स. चे विस्तार अधिकारी ढोणे, ग्रामपंचायत सरपंच निलम संजय बिन्नोड उपस्थित होत्या. त्यांनी ज्या लाभार्थ्यांना घरकूल मिळाले, त्या लाभार्थ्यांकडे जाऊन स्वत: पाहणी केली. शौचालयाचा वापर करण्याचे आदेशही दिले. जे शौचालय वापरत नसेल, त्यांना १२०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे सांगितले. यावेळी ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.