जि.प. शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम

By admin | Published: June 26, 2017 12:42 AM2017-06-26T00:42:59+5:302017-06-26T00:42:59+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जि.प.चा शिक्षण विभाग धडपडत आहे.

Zip The educational status of the schools is the best | जि.प. शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम

जि.प. शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम

Next

जयश्री गफाट : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळा गाठावी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जि.प.चा शिक्षण विभाग धडपडत आहे. शिक्षकांकडून होत असलेल्या या धडपडीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले आहे. याच दर्जामुळे अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना कॉन्व्हेंटमधून काढून जि. प.च्या शाळेत टाकल्याचे जि. प. शिक्षण सभापती जयश्री गफाट यांनी सांगितले.
ईदची सुटी आल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा मंगळवारी उघडत आहे. शासनाच्या नियमानुसार २६ जून शाळेचा पहिला दिवस ठरत आहे. शिवाय याच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असल्याने समाजिक न्याय दिनाचा कार्यक्र्रम होतो. शाळा आता एक दिवस विलंबाने सुरू होत आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना जि.प.च्या शाळांत राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत जावे, आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Zip The educational status of the schools is the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.