जि.प. शिक्षकांच्या बदलीचा काल्पनिक गुंता

By Admin | Published: April 10, 2017 01:24 AM2017-04-10T01:24:44+5:302017-04-10T01:24:44+5:30

मे महिना जवळ येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली करण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे;

Zip Improvistation of teacher transfers | जि.प. शिक्षकांच्या बदलीचा काल्पनिक गुंता

जि.प. शिक्षकांच्या बदलीचा काल्पनिक गुंता

googlenewsNext

अधिकाऱ्यांच्या स्वमर्जीने अवघड क्षेत्र यादी प्रस्तावित
समुद्रपूर : मे महिना जवळ येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली करण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे; परंतु यावर्षी शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदलीचे क्षेत्र अवघड आणि सर्वसाधारण असे विभागून शिक्षकामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. याच अनुषंगाने अवघड क्षेत्रातील बदलीकरिता तीन वर्षांची सेवा ग्राह्य धरल्यामुळे नेमके अवघड क्षेत्रात गावाची निश्चिती कशी करायची, याचे प्रशासकीय अधिकारी आपापल्या परीने तर्कवितर्क लावत आहेत.
समुद्रपूर पं.स. अंतर्गत जवळपास ४५ ते ५० गावे जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार अवघड क्षेत्रात समाविष्ट होतात. स्थानिक शिक्षण विभागाने ३६ गावांची यादी तयार केली; परंतु बदली विषयाच्या नावाखाली केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या घेतलेल्या सभेत फक्त १३ गावे अवघड क्षेत्रात येत असल्याचे जि.प. प्रशासनाकडे प्रस्तावित केले. सदर सभेत केंद्र प्रमुखांनी आपापल्या केंद्रातील अवघड क्षेत्रात येत असलेल्या गावांची स्पष्ट कारणमिमांसा न केल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी यादीत कट मारला असल्याचे बोलले जात आहे.

अवघड क्षेत्राची स्पष्ट माहिती देण्याची मागणी

समुुद्रपूर : तालुका स्थळापासून २५ कि़मी. अंतरावरील, मुख्यमार्गापासून दोन किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आणि दळणवळण सुविधा नसणारे, राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा नसलेले आणि महिलांच्या दृष्टिने जाण्या येण्यास अडचणींचे असलेले अश्या गावांचा अवघड क्षेत्रात समावेश करावा असे जिल्हास्तरावरुन निर्देश मिळाल्याचे स्थानिक शिक्षण विभाग सांगतात. तेव्हा या निर्देशाला अनुसरुन तालुक्यापासून ३० कि़मी. दूर असलेल्या व दळणवळण सुविधा नसलेल्या कोरा केंद्रातील पवनगाव, गांगापूर करुळ, एकोडी, चाफापूर या गावाचा, निंभा केंद्रातील किन्ही, धरणाच्या पुरात अडकलेले झुनका, बससेवा नसलेले कवठा, गिरड केंद्रातील जंगलात असलेले आर्वी, तावी, मोहगाव, भोसा केंद्रातील पारडी, रज्जाकपूर ते देरडा, बावापूर, नंदोरी केंद्रातील डोंगरगाव, गणेशपूर, बल्लारपूर, हळदगाव केंद्रातील खंडाळा, शिवणी बेडासह इतर केंद्रातील महिलांच्या दृष्टीने अवघड व जाण्यायेण्याची सोयसुविधा नसलेले १५ ते २० गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करुन जि.प. प्रशासनाकडे प्रस्तावित करायला पाहिजे होती. परंतु, स्थानिक पातळीवरील संंबंधित अधिकाऱ्यांनी एकूण घेतले नसल्याचे शिक्षण विभाग सांगतात जिथे नोकरी तिथे मुख्यालय तेव्हा जाण्या-येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अवघड क्षेत्राचा लाभ नाही, असाही प्रतिप्रश्न बोलला गेल्याचे शिक्षक सांगतात.
एकंदर अधिकाऱ्यांच्या मर्जीने शासननिर्णयाची अंमलबजावणी करणे, संबंधित शिक्षण विभागाची चुप्पी यामुळे मात्र शिक्षण हैरान होऊन अवाजवी त्रासाला सामोरे जात आहे. तेव्हा अवघड क्षेत्रातील गाव निश्चितीचे स्वयंस्पष्ट व शिक्षकांना समाधानकारक असे धोरण जि.प. प्रशासनाने ठरवावे जेणे करुन जास्तीत जास्त शिक्षकांना बदलीचा लाभ देता येईल.(तालुका/शहर प्रतिनिधी)

प्रस्तावित केलेल्या यादी व्यतिरिक्त इरतही केंद्रातील गावे लांब अंतरावरील असून सोयीसुविधा नसलेले आहे. नदी, धरण, जंगलव्याप्त असलेल्या गावाची माहिती जि.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिली जाईल.
- अजय गावंडे, विभागीय अध्यक्ष, प्राथ.शिक्षक संघ,जि. वर्धा

Web Title: Zip Improvistation of teacher transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.