जि.प. शाळेचे पालटले रुपडे
By admin | Published: March 20, 2017 12:44 AM2017-03-20T00:44:16+5:302017-03-20T00:44:16+5:30
काळ बदलत गेला तसा विचारही बदलत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जाऊन इंग्रजी शिक्षण घेऊ लागली.
कॉन्व्हेंटकडील कल कमी : ग्रामस्थांसह पालकांत समाधान
पिंपळखुटा : काळ बदलत गेला तसा विचारही बदलत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जाऊन इंग्रजी शिक्षण घेऊ लागली. यामुळे गावांतील मराठी शाळा ओस पडत आहेत. अशातच येथील जिल्हा परिषदेचे मात्र रूपच पालटले आहे. शाळेच्या रंगरंगोटीसह शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न सफल झाले. शाळा सुधारल्याने कॉन्व्हेंटकडील कल कमी झाल्याचे चित्र आहे.
जि.प. प्राथमिक शाळा पिंपळखुटा येथील सर्व शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची शपथ घेतली. शिवाय त्याचा निकालही दिल्याने गावातील विद्यार्थी शहराऐवजी गावातच शिक्षण घेत असल्याचे दिसते. शहरातील इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे येथील विद्यार्थीही प्रगत झाल्याचे दिसते. शाळेला जि.प. उपशिक्षणधिकारी इंगोले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शाळा रंगरंगोटी करून आकर्षक केली आहे. शालेय परिसर लक्षवेधक आहे. परसबागेत भाजीपाला लागवड केली आहे. विद्यार्थी उत्साही आहे. मध्यान्ह भोजन व्यवस्थित आहे. भरघोस लोकसहभागातून हे रूप पालटता आले आहे. यामुळेच ‘उत्कृष्ट’ असा शेरा अधिकाऱ्यांनी दिला आहे. यासाठी मुख्याध्यापिका मंदा पांडे, राहुल राजनेकर, शिक्षक रमेश पठाडे, केंद्र प्रमुख यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)