झुडपी जंगल होणार ‘आॅक्सिजन पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:38 PM2018-05-23T23:38:47+5:302018-05-23T23:38:47+5:30

पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे.

Zodpi Jungle to be 'Oxygen Park' | झुडपी जंगल होणार ‘आॅक्सिजन पार्क’

झुडपी जंगल होणार ‘आॅक्सिजन पार्क’

Next
ठळक मुद्दे२६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : संगोपनाचे मॉडेल तयार करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. यंदा बहुतांश वृक्ष लागवड जिल्ह्यातील झुडपी जंगलावर करण्यात येणार असून त्यांना ‘आॅक्सिजन पार्क’, असे संबोधण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षांपासून १ ते ७ जुलै दरम्यान महावृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येतो. हे तिसरे वर्ष असून यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात २६ लाख ७७ हजार ३४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यात ५० हजार वृक्ष लागवडीचा एक गट निवडण्यात येईल. झाडे टिकविण्यासाठी तिथे कुंपण व पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. झाडांना पाणी व खत देण्यासाठी म.गां.रोहयोमधून मजूर लावण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून झुडपी जागेची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात एक हजार वृक्ष लागवड होईल, अशी जागा ग्रामपंचायतीने निवडून त्यावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
१० हजारांच्या वर एका ठिकाणी वृक्ष लागवड करणाऱ्या विभागाने त्या ठिकाणी पाणी, कुंपण व पाणी देण्यासाठी मजुराची व्यवस्था, अशा पद्धतीने मॉडेल तयार करूनच काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी आज झालेल्या वृक्ष लागवड बैठकीत दिल्या. स्वयंसेवी संस्थांनी जमिनीचे मोठे पट्टे निवडून वृक्ष लागवड करावी. कोणत्या विभागाकडे वा संस्थेकडे वृक्ष लावण्यासाठी जमीन नसल्यास जमिनीची मागणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. तेथील लोकांच्या उपयोगात येतील, असे वृक्ष लावण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम कमी झाले आहे. मे अखेरपर्यंत सर्व मोठ्या विभागांनी ८० टक्के काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, उपवनसरंक्षक सुनील वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, इतर विभाग प्रमुख व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात वनविभाग ७ लाख ९५ हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जि.प. ६ लाख २९ हजार ८८०, शालेय शिक्षण १ लाख २२ हजार ८०, कृषी विभाग ३ लाख १२ हजार ६२५, जलसंपदा १ लाख ७ हजार ५३५, गृह विभाग ४१ हजार ९०, सार्वजनिक बांधकाम ३८,११०, नगर विकास २०,६७५, जलसंधारण निम्न वर्धा २४,८१०, पाणी पुरवठा व स्वच्छता २०,३३०, इतर विभाग ६५,२०५ असे एकूण २६ लक्ष ७७ हजार ३४० वृक्षांचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Zodpi Jungle to be 'Oxygen Park'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.