इलेक्ट्रिक मालाच्या खरेदी-विक्रीत महिलेला १ कोटी ७ लाखांना लुबाडले
By धीरज परब | Published: May 29, 2024 08:03 PM2024-05-29T20:03:55+5:302024-05-29T20:04:10+5:30
भाईंदर पूर्वेला भाजी मार्केट गल्लीतील अशोक भवन येथे त्यांचे कार्यालय आहे.
मीरारोड - इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदी-विक्रीत एका महिलेची १ कोटी ७ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवलीच्या फॅक्टरी लेन येथील गोकुळ गगन इमारतीत राहणाऱ्या सोनल तेजस शहा यांचा इलेक्ट्रॉनिक वस्तू व पार्टचा व्यवसाय आहे. भाईंदर पूर्वेला भाजी मार्केट गल्लीतील अशोक भवन येथे त्यांचे कार्यालय आहे. दिल्ली येथील खन्ना इंडस्ट्रीजच्या नेहा खन्ना यांनी ६ हजार एलईडी टीव्ही पुरवण्याची हमी दिली होती. २ कोटी रुपयांपैकी ६५ लाख रुपये हे शाह यांनी खन्ना यांना आगाऊ रक्कम म्हणून दिले होते. परंतु त्यांनी शाह यांना ठरल्या प्रमाणे माल दिलाच नाही.
तर उत्तर प्रदेशच्या नोयडा येथील अकबरा इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेडचे चंद्रशेखर चोहान व अपूर्वा शर्मा यांनी इलेक्ट्रिक मालाच्या बदल्यात देय असलेली ४२ लाख रुपयांची रक्कम दिली नव्हती. चंद्रशेखर चौहान व अपूर्वा शर्मा तसेच नेहा खन्ना यांनी आपसात संगनमत करून कटकारस्थान रचून १ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक केली अशी फिर्याद सोनल शहा यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिली. त्या अनुषंगाने नवघर पोलिसांनी २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आह. २०१८ ते २०२० दरम्यान हा सर्व प्रकार घडला असून लाखोंची रक्कम हि हवाला मार्फत पाठवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवास गारळे हे अधिक तपास करत आहेत.