10 वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा, विरार-नालासोपारात नवे २२ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 10:04 PM2020-05-27T22:04:20+5:302020-05-27T22:04:54+5:30

नालासोपारा पूर्वेतील 65 व 73  वर्षीय पुरुष दोघा रुग्णाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू !  

A 10-year-old boy was diagnosed with coronary heart disease in Virar-Nalasopara | 10 वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा, विरार-नालासोपारात नवे २२ रुग्ण आढळले

10 वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा, विरार-नालासोपारात नवे २२ रुग्ण आढळले

Next

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी वसई वगळता-विरार व नालासोपारा भागात पुन्हा सर्वाधिक असे 22 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून पालिका हद्दीतील 5 रूग्ण मुक्त देखील झाले, तर धक्कादायक म्हणजे यात नालासोपारा पूर्वेस वास्तव्यास असलेले 65 व 73 वर्षीय दोन कोरोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता बुधवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 603  वर पोहचली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आढळून आलेल्या एकूण रुग्णामध्ये 15 पुरुष व 7 महिला रुग्णांचा समावेश आहे,
यात खास म्हणजे नालासोपारा पूर्वेतील 10 वर्षाचा मुलगा कोरोना बाधित आढळून आला आहे. एकंदरीत पालिका हद्दीत वसईत एकूण 6 पुरुष 2 महिला तर नालासोपारात 8 पुरुष व 5 महिला आणि विरार मध्ये फक्त 1 पुरुष आढळून आला आहे.

नालासोपारात दोघांचा कोरोनाने मृत्यू !
वसई विरार हद्दीतील नालासोपारा पूर्वेस वास्तव्यास असलेले 65 वर्षीय व 73 वर्षीय अशा दोन कोरोना बाधित रुग्णाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, धक्कादायक म्हणजे रविवार पासून नालासोपारात दररोज बाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे,त्यामुळे आता पालिका हद्दीत आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे. या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर बुधवारी पालिका हद्दीत नालासोपारा 4 व कामण मधून 1असे 5 जण मुक्त झाले असल्याने आता आजवर पालिका हद्दीत एकूण 250 जण मुक्त झाले, तर आजवर 331 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत      
नालासोपारात दोघांचा कोरोनाने मृत्यू !
वसई विरार हद्दीतील नालासोपारा पूर्वेस वास्तव्यास असलेले 65 वर्षीय व 73 वर्षीय अशा दोन कोरोना बाधित रुग्णाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, धक्कादायक म्हणजे रविवार पासून नालासोपारात दररोज बाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे,त्यामुळे आता पालिका हद्दीत आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे.

दि.27 मे 2020 बुधवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारी

वसई -6 पुरुष 2 महिला 
नालासोपारा -8 पुरुष 5 महिला

विरार -1 पुरुष 

एकूण रुग्ण संख्या  -22

वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -603

कोरोना मुक्त संख्या :- 250

कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 22

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-331
 

Web Title: A 10-year-old boy was diagnosed with coronary heart disease in Virar-Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.