मोखाड्यात तीन वर्षांत झाले १०५ बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:46 PM2019-02-09T23:46:35+5:302019-02-09T23:46:56+5:30
१९९२-९३ च्या वावर - वांगणीतील कुपोषण व भूकबळी झाल्यापासून जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके कुपोषणाच्या प्रश्नावरुन नेहमीच चर्चत राहीले आहेत.
- रविंद्र साळवे
मोखाडा : १९९२-९३ च्या वावर - वांगणीतील कुपोषण व भूकबळी झाल्यापासून जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके कुपोषणाच्या प्रश्नावरुन नेहमीच चर्चत राहीले आहेत या भयाण मृत्यूकांडाची शासनाने त्यावेळेस तात्काळ दखल घेऊन जव्हार येथे जिल्हा अप्पर कार्यालय हलवण्यात आले व येथील कुपोषण व भूकबळी थांबवण्यासाठी शासनाने तात्काळ कोट्यावधी रुपयांच्या निधीची देखिल तरतूद केली. यामुळे बालमुत्यू कुपोषण कमी होईल असे वाटत होते मात्र आज जवळपास २५ वर्षाचा कालावधी उलटून ही कुपोषण व भूकबळी ची समस्या अजून संपलेली नाही.
कुपोषणाच्या बरोबरच मोखाडा तालुक्यांत बालमृत्यृचे प्रमाण ही अधिक प्रमाणात असल्याचे सरकारी आकडेवारी वरु न दिसून येते गेल्या तीन वर्षात मोखाड्यात १०५ बालमृत्यृ झाल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.
मोखाडा एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालया अंतर्गत येणाऱ्या १७८ मुळ अंगणवाडी व ५१ मिनी अंगणवाडी कार्यक्षेत्रांतर्गत एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१८ पर्यत २५ नवजात बालकाचे मृत्यूची नोंद शासन दरबारी असून तसेच ० ते ६ वयोगटातील ५० बालाकांचे मृत्यू झाले आहेत
सरकारी कागदोपत्री जरी १०५ बालमृत्यू झाल्याची नोंद असली तरी प्रत्येक कक्षात मात्र हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.
कुपोषण निर्मूलन व गरोदर माताच्या आहारावर कोट्यावधी
रुपये खर्च होऊनही या सर्व उपाययोजनांचा पुरता फज्जा उडाल्यांचे चित्र या बालमृत्यू मुळे समोर आले आहे.
कारवाई काय होते याकडे सगळ््यांचे लक्ष
गरोदर माता ची तपासणी त्यांना दिला जाणारा सकस आहार गरोदर पणातील मार्गदर्शन देखील वेळेवर केले जात नाही. यामुळे सरकारी यंत्रने मार्फत होणारा लाखोचा खर्च कुठे जातो असा प्रश्न असून यामुळे विचारला जात आहे.
कुपोषण आटोक्यात आणण्याचा आव आणणाºया प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही आकडेवारी आहे. त्यामुळे आता शासकीय स्तरावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.