१०८ रुग्णसेवा ठरली गर्भवतींना दिलासा
By Admin | Published: January 25, 2017 04:29 AM2017-01-25T04:29:04+5:302017-01-25T04:29:04+5:30
मोखाडा तालुक्यात १०८ अॅम्ब्युलन्स सेवा ही आदिवासी बांधवासाठी प्रसूतीचे माहेर घर बनली आहे. गेल्या वर्षभरात या अॅम्ब्युलन्स मध्ये ५० महिलांच्या प्रसूती उत्तमरित्या झाल्या आहेत
रविंद्र साळवे / मोखाडा
मोखाडा तालुक्यात १०८ अॅम्ब्युलन्स सेवा ही आदिवासी बांधवासाठी प्रसूतीचे माहेर घर बनली आहे. गेल्या वर्षभरात या अॅम्ब्युलन्स मध्ये ५० महिलांच्या प्रसूती उत्तमरित्या झाल्या आहेत
मोखाडा तालुक्यात ४० ते ५० किमी अंतरावर २५८ गावपाडे आहेत. यामुळे प्रसूती दरम्यान मोखाडा ग्रामीण रु ग्णालयात पोहचण्यास खूपच उशीर लागतो यामुळे अनेकदा त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. परंतु १०८ अॅम्ब्युलन्स सेवा आल्या पासून तालुक्याच्या शेवटच्या घटकापर्यंत हि सेवा पोहचली जात असल्याने गरोदर माताना एकतर सुतिका गृहापर्यंत वेळेत पोहचविले जाते किंवा रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती होते. त्यामुळे सेवेचा परिपूर्ण फायदा आदीवासींना झाला आहे . नुकतेच गोंदे खुर्द येथील कल्पना वळवी (वय २५) या आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी मोखाडयाहून जव्हारला पोहचवित असतांना तिची स्थिती गंभीर झाली. परंतु डॉ पंजाबराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने त्यांची प्रसूती अॅम्ब्युलन्स मध्येच सुखरूप झाली.