२ बाय २च्या जागेच्या भाड्यापोटी पश्चिम रेल्वेला पॉलिशवाल्यांनी दिले ११ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:27 AM2018-06-29T02:27:05+5:302018-06-29T02:30:46+5:30

ए! मै कोई भीख नही ले रहा, मेहनत का पैसा है। हाथ मे उठा के दे असे म्हणणारा, बुटपॉलिश करणारा लहानवयातील अमिताभ आणि बडा हो के ये लडका लंबी रेस का घोडा बनेगा हा इफ्तेखार याचा डायलॉग अजरामर झाला आहे.

11 lakhs paid by the policemen to the Western Railway by paying 2 by-2 seats | २ बाय २च्या जागेच्या भाड्यापोटी पश्चिम रेल्वेला पॉलिशवाल्यांनी दिले ११ लाख

२ बाय २च्या जागेच्या भाड्यापोटी पश्चिम रेल्वेला पॉलिशवाल्यांनी दिले ११ लाख

Next

वसई : ए! मै कोई भीख नही ले रहा, मेहनत का पैसा है। हाथ मे उठा के दे असे म्हणणारा, बुटपॉलिश करणारा लहानवयातील अमिताभ आणि बडा हो के ये लडका लंबी रेस का घोडा बनेगा हा इफ्तेखार याचा डायलॉग अजरामर झाला आहे.
नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांना त्यांच्या वृद्धत्वात ते बेघर झाले असता त्यांना मायेने सांभाळणारा बुटपॉलीशवाला सगळ्यांच्याच काळजाला चटका लावून गेला आहे. अशा बूटपॉलिशवाल्यांचे आणखी एक रूप समोर आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या स्थानकांवर २ बाय २ च्या छोट्याशा जागेत बूटपॉलिश करणाऱ्या या श्रमिकांनी या जागेच्या भाड्यापोटी ११ लाख ६६ हजार , १४२ रुपये पश्चिम रेल्वेच्या खजिन्यात जमा केले आहेत.
पश्चिम रेल्वेकडे माजी नगरसेवक राज कुमार चोरघे यांनी माहिती अधिकाराखाली विरार ते चर्चगेट स्टेशन वरील फलाटावर बूट पॉलिश करून पोट भरणाºया कामगारांबाबत सविस्तर माहिती मागवली होती, त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारीआरती सिंग परिहार यांनी ती दिली आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या माहितीनुसार पश्चिम रेल्वच्या विरार ते चर्चगेट दरम्यानच्या प्रत्येक स्थानकातील प्रत्येक फलाटावर दोन फूट बाय दोन फूट च्या जागेत बसणाºया एकूण २६३ बूट पॉलिशवाल्यांकडून मासिक भाड्या पोटी सन २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात ११ लाख ६६ हजार , १४२ रुपयांचे भाडे प्राप्त झाले आहे,
हा व्यवसाय अत्यंत संघटीतपणे चालतो. हा व्यवसाय करू इच्छिणाºया व्यक्तीला आधी त्यांच्या असलेल्या सहकारी संस्थेचा सदस्य व्हावे लागते. तिच्याकडून परवाना घ्यावा लागतो. मग त्याला ही संस्था उपलब्ध असेल त्या प्रमाणे व्यवसाय करण्याची जागा नेमून देते. तिथेच त्याला करता येतो. त्याबदल्यात त्याला सोसायटीला काही रक्कमही द्यावी लागते. त्यातूनच ती रेल्वेकडे भाड्याचा भरणा करते. एक शिफ्ट सात ते आठ तासांची असते. सकाळच्या शिफ्टमध्ये व्यवसाय जास्त होत असल्याने तिला सर्वाधिक मागणी असते. तर संध्याकाळपर्यंत चालणाºया शिफ्टला त्यामानाने कमी मागणी असते.

विरार -चर्चगेट दरम्यान एकूण २६३ बूट पॉलिश करणारे कामगार हे त्यांच्या ८ विविध सहकारी संस्थांच्या माध्यमाने त्याठिकाणी काम करतात , व ह्या संस्था हे भाडे कामगारांच्यावतीने रेल्वेला देत असते, विरार -मीरा रोड -१२, नालासोपारा -विरार -१२ , मीरा रोड -वसई रोड -२२ ,बोरिवली -बांद्रा -२५ ,खार -गोरेगाव -५३ ,बांद्रा -दादर -५० ,मालाड -विलेपार्ले -१९ मुंबई सेंट्रल -चर्चगेट -७० असे एकूण २६३ कामगार हे फलाटावर बूट पॉलिश करीत आहेत.

 

Web Title: 11 lakhs paid by the policemen to the Western Railway by paying 2 by-2 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.