बॅसिनच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:28 AM2018-12-02T01:28:52+5:302018-12-02T01:29:30+5:30
तत्कालीन नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर बोगस कागदपत्रांच्या आधारे प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याप्रकरणी वसईतील दोन विकासकांसह प्लॉट खरेदी करून बंगले बांधणाऱ्या ११ जणांवर वसई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसई : तत्कालीन नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर बोगस कागदपत्रांच्या आधारे प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याप्रकरणी वसईतील दोन विकासकांसह प्लॉट खरेदी करून बंगले बांधणाऱ्या ११ जणांवर वसई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन विकासकांपैकी एक बॅसिन कॅथोलिक बॅकेचे चेअरमन ओनिल आल्मेडा असल्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे.
मे.वेलकास्ट कंट्रक्शन कंपनीचे भागीदार तथा वसईतील अग्रगण्य बॅकेचे विद्यमान चेअरमन ओनिल आल्मेडा व त्यांचा साथीदार विकासक मिल्टन परेरा यांनी तत्कालीन नगरपरपरिषदेच्या राखीव भूखंडावर २० फेब्रुवारी १९९८ मध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे सिडकोकडून बांधकाम परवानगी घेतली होती. ही जागा २७ जुलै १९९८ ला असोसिएट प्लॅनर सिडकोकडून रिलोकेट केली गेली.
सदर जागेचे एफ. एस. आय . मे.वेलकास्ट कंट्रक्शन कंपनीने वापर करून इमारतीचे बांधकाम करून विक्र ी केली होती. मात्र, आता २० वर्षानंतर सदर जागा ही तत्कालीन नगर परिषदेसाठी मैदान व उद्यानासाठी राखीव असल्याचे लक्षात आल्यावर १३ जुलै २०१८ रोजी प्रभाग समिती आयचे तत्कालीन सहा आयुक्त रतेश किणी यांनी सदर दोन विकासक व जागा खरेदी करणारे इतर भागीदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वसई पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार नगर रचना विभागाकडून तत्कालीन नगरपरिषदेच्या ८ ,डिसेंबर १९९५ च्या कागदपत्रांची छाननी केली असता, सदर भूखंड आरक्षित असताना बनावट कागदपत्रे बनवून तत्कालीन नगरपरिषदेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. तसेच, २८ फेब्रुवारी २००० च्या जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडून देण्यात आलेल्या बिनशेती परवानगी कागदपत्रे तपासले असता ४३५०.२७ चौरस मीटर क्षेत्र हे मैदान व उद्यानासाठी आरिक्षत असल्याचे समोर आले होते.
याबाबत आता प्रभाग समिती आयचे विद्यमान सहा. आयुक्त मनोज वनमाळी यांनी वसई पोलिस ठाण्यात सबंधीत दोन विकासक व इतर ११ भागीदारांवर तक्र ारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत फसवणूक व एमआरटीपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए.एम.मुल्ला करित असल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले. तर आल्मेडा यांनी या प्रकरणी आम्ही कुणाचीही फसवणूक केली नसल्यचा निर्वाळा दिला आहे.
>कोण आहेत आरोपी...
ओनिल आल्मेडा, मिल्टन परेरा, संजय डिकोना, शुभांगी पाटील, श्रद्धा पाटील, किशोरी गवसकर, अजय डिकोना, विल्यम डिसिल्वा, मनिष घोन्सालवीस, निलेश घोन्सालवीस, आॅसडेन परेरा, जोसेफ रोजारिवो व रूकसाना तुलसीधरण असे मुख्य आरोपी असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
>संबंधितांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत तपास करून दोषी आढळल्यास कारवाई करून अटक करणार आहोत.
- दामोदर बांदेकर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिकपूर पोलिस ठाणे