१२२ कोटींचा घोटाळा विधानपरिषदेत; ४८ आमदारांनी विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:04 PM2019-06-21T23:04:01+5:302019-06-21T23:04:20+5:30

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

122 crore fraud scam in Vidhan Parishad; 48 MLAs asked questions | १२२ कोटींचा घोटाळा विधानपरिषदेत; ४८ आमदारांनी विचारला प्रश्न

१२२ कोटींचा घोटाळा विधानपरिषदेत; ४८ आमदारांनी विचारला प्रश्न

Next

नालासोपारा : २ मार्च २०१९ ला विरार पोलीस ठाण्यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या २५ कंत्राटदारांनी ३१६५ ठेका कर्मचाऱ्यांचे पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता यांचे १२२ कोटी रुपये हडप केले म्हणून मनोज पाटील यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वसई तालुक्यात खळबळ माजली होती. या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी लोकमतमध्ये अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण गेंड्याच्या कातडीचे पालघर पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी यांना या कामगारांचे काहीही सोयरसुतक नव्हते. इतका मोठा घोटाळा करून कंत्राटदार गुन्हा दाखल झालातरी मोकाट व बिनधास्त वसई तालुक्यात वावरत होते. पण अखेर हा १२२ करोडचा घोटाळा विधानपरिषदेत ४८ आमदारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने गाजला आणि मुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांना चौकशी करून तीन महिन्यात अहवाल देण्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यावर गरीब कामगारांना आता तरी न्याय मिळेल अशी आशा वसईतील जनतेला वाटू लागली आहे.

वसई-विरार महापालिकेतील ठेका कर्मचाºयांची कंत्राटदार व महानगरपालिकेचे अधिकारी यांनी केलेली लूट तसेच शासन कराची चोरी असे एकूण १२२ करोड रुपयाच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी व त्यावरील कारवाईसंबधी प्रश्न विधान सभेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, संजय केळकर, पास्कल धनारे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव व इतर अशा एकूण ४८ आमदारांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता.
त्याला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांना सखोल चौकशीचे व तीन महिन्यात यासंबधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

नेमके काय होते प्रकरण
वसई विरार मनपाच्या ३१६५ ठेका कर्मचाºयांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण १२२ करोडच्या घोटाळ्यात २९ करोड ५० लाख रुपयाचा शासकीय महसूलचाही समावेश असून ९२ करोड ५० लाख रुपये कर्मचाºयांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाºयांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

Web Title: 122 crore fraud scam in Vidhan Parishad; 48 MLAs asked questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.