महापालिकेत ठेकेदारांचा १२२ कोटींचा अपहार, गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:32 PM2019-03-04T23:32:23+5:302019-03-04T23:32:35+5:30
ठेका कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच शासनाची कर चोरी करून सुमारे १२२ कोटीहून अधिक रकमेचा अपहार केल्या प्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या २५ ठेकेदारावर विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळ : ठेका कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच शासनाची कर चोरी करून सुमारे १२२ कोटीहून अधिक रकमेचा अपहार केल्या प्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या २५ ठेकेदारावर विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप वसई -विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या तक्र री वर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
महापालिका स्थापना म्हणजेच जुलै २००९ पासून फेब्रुवारी २०१८ पर्यंत हे सर्व ठेकेदार महापालिकेत ठेका पद्धतीने कर्मचारी पुरवठा करण्याचे काम करीत होते एकूण ३१६५ पेक्षा जास्त ठेका कर्मचारी ज्यामध्ये वकील, अभियंते, डॉक्टर, आरोग्य व अग्निशमन कर्मचारी, संगणक चालक, लिपिक, मजूर, सुरक्षारक्षक, मजूर, वाहन चालक, इ चा समावेश आहे, यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक करून तसेच शासनाची मोठ्या प्रमाणात कर चोरी करून ठेकेदारांनी कोट्यवधी रु ची लूट केली आहे. यामध्ये देयकासोबत आवश्यक कागदपत्रे तसेच वैधानिक तरतुदींची पूर्तता नसताना दरमहा लाखो रु पयाची देयके मंजूर करून रक्कम ठेकेदाराला अदा करणारे संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग व आशीर्वाद असल्यामुळेच ठेकेदारानी ठेका कर्मचाऱ्यांना किमान वेतन, कर्मचारी भविष्य निधी तसेच अनेक लाभांपासून वंचित ठेवून वेठबिगारी पद्धतीने राबवून घेतल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती मध्ये स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या २५ ठेकेदारांनी शासनाच्या सेवाकर व व्यवसाय कराचे सुमारे रु २०.५१ कोटी व कर्मचारी वेतन रु ९२.९७ कोटी असे एकूण सुमारे रु . १२२.४८ कोटी चा अपहार केल्याचे दिसून येते.
>असा घडला आहे हा गुन्हा
यामध्ये देयकासोबत आवश्यक कागदपत्रे तसेच वैधानिक तरतुदींची पूर्तता नसताना दरमहा लाखो रुपयाची देयके मंजूर केली. ठेकेदारानी ठेका कर्मचारयांना किमान वेतन, कर्मचारी भविष्य निधी व अन्य लाभांपासून वंचित ठेवून बेठबिगारीने राबवून घेतल्याचे उघड झाल्यानंतर त्यासंबंधी पुरावयासह केलेल्या लेखी तक्र ारीची गंभीर दाखल घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.