मीरा-भाईंदरमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग शोध मोहिमेसाठी १२४ पथके तैनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:30 PM2020-11-29T17:30:54+5:302020-11-29T17:31:23+5:30

Mira Bhayandar : नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून या मोहिमेसाठी वैद्यकीय पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

124 squads deployed in Mira Bhayandar for leprosy and tuberculosis research campaign | मीरा-भाईंदरमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग शोध मोहिमेसाठी १२४ पथके तैनात 

मीरा-भाईंदरमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग शोध मोहिमेसाठी १२४ पथके तैनात 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील क्षयरोगी व कुष्ठरोगी यांच्या शोध व उपचारासाठी १ ते ३० डिसेंबर दरम्यान मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने १२४ पथके तैनात केली आहेत. नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून या मोहिमेसाठी वैद्यकीय पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालानाथ चकोर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शहरातील  २०१९ - २०२० या आर्थिक वर्षात क्षयरोग निदानाचे प्रमाण १०४ टक्के होते. पण यंदा कोरोना संसर्गामुळे पालिकेच्या क्षयरोग निदानाचे प्रमाण ५३ टक्के इतके  कमी झाले आहे. शहरात पालिकेच्या नोंदी सध्या ४९१ रुग्ण उपचार घेत आहेत. या दोन्ही आजारांचे निदान होऊन रुग्ण उपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णांना या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. जेणेकरून संसर्गाची साखळी अखंडित राहते. 

क्षयरोग आणि कुष्ठरोगच्या निवारणाचे साठी सदर मोहीम सुरु केली जात असून पहिल्या १५ दिवसात वैद्यकीय पथके घरोघरी भेटी देणार आहेत . तर दुसऱ्या पंधरवड्यात संशयितांचे थुंकी नमुने व एक्सरे  तपासले जातील. जोखमीचे भाग - झोपडपट्टी , बांधकाम ठिकाणे , मजूर अड्डे , स्थलांतरित आदी जोखमीच्या भागात क्षयरोग व कुष्ठ रोग्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे . त्यांना तातडीने उपचाराखाली आणणे आवश्यक आहे . 

या सर्वेक्षणासाठी पालिकेच्या ९ केंद्रातील कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे . सदर ९ आरोग्य केंद्रांच्या अखत्यारित ९ लाख १६ हजार ६६० इतकी लोकसंख्या आहे. तर प्रति घर चार माणसे धरून ६८ हजार ७४८ इतकी घरे आहेत. दिवसाला ४ हजार ५८२ घरांचे सर्वेक्षण करायचे आहे. त्यासाठी १२४ पथके व २७ निरीक्षक नेमण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून अंदाजे १३ हजार ७४८  संशयित रुग्ण सापडणे अपेक्षित असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले . 

Web Title: 124 squads deployed in Mira Bhayandar for leprosy and tuberculosis research campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.