मुरबाड नगरपंचायत निवडणुकीसाठी १२५ उमेदवार
By admin | Published: October 9, 2015 11:26 PM2015-10-09T23:26:41+5:302015-10-09T23:26:41+5:30
१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १७ प्रभागांसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आणि अपक्ष अशा विविध पक्षांच्या एकूण
मुरबाड : १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १७ प्रभागांसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आणि अपक्ष अशा विविध पक्षांच्या एकूण १२५ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय सावळकर व सहायक निवडणूक अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नव्यानेच मुरबाड तालुक्यातील नागरिकांना नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरसेवक व नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली असल्याने त्या पदावर आपल्याच पार्टीच्या उमेदवाराची वर्णी लागावी म्हणून सर्वच पक्षांनी रणनीती आखली असल्याने या नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा, सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यासह इतर पक्षांनी कोणत्याही पक्षाबरोबर हातमिळवणी न करता या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी केली आहे. या आखाड्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय व बहुजन समाज पार्टीने मात्र अलिप्त राहण्याचा पवित्रा घेतल्याने त्या पक्षांचे मुरबाडमधील भवितव्य धोक्यात आले आहे.