१२६ शिक्षकांची चौकशी

By admin | Published: May 25, 2016 04:34 AM2016-05-25T04:34:21+5:302016-05-25T04:34:21+5:30

या जिल्हा परिषदेच्या तब्बल १२६ शिक्षकांनी वेतनवाढ आणि पदोन्नती लाटण्यासाठी सरकारी नियम धाब्यावर बसवून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी मिळवण्याची गंभीर

126 teachers inquiry | १२६ शिक्षकांची चौकशी

१२६ शिक्षकांची चौकशी

Next

- शशी करपे,  वसई
या जिल्हा परिषदेच्या तब्बल १२६ शिक्षकांनी वेतनवाढ आणि पदोन्नती लाटण्यासाठी सरकारी नियम धाब्यावर बसवून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी मिळवण्याची गंभीर बाब उघडकीस आली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी तत्कालीन केंद्रप्रमुख आणि कार्यालयीन प्रमुखांचीही चौकशी केली जाणार आहे.
वसई तालु्नयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तब्बल १२६ शिक्षकांनी अनेक करामती करून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी संपादन करून पदोन्नती आणि वेतनश्रेणी लाटल्याची सविस्तर बातमी २३मे२०१६ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वसई पंचायत समितीच्यागटशिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी संबंधित कॉलेज मध्ये राहणे अनिवार्य असते. त्यामुळे ज्या शिक्षकांनी बी. एड, बी.पी.एड पदवी मिळवण्यासाठी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
त्या कॉलेजकडून संबंधितांची उपस्थिती प्रमाणपत्र घेण्याचे निर्देशही गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पदवी घेतलेल्या काळात संबंधित शिक्षक शाळेत कामावर हजर होते का? याबाबतही सविस्तर माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
उच्च शैक्षणिक पदवी मिळवण्यासाठी संबंधितांनी आवश्यक परवानगी घेतलेली नाही, घेतलेल्या रजेची सेवा पुस्तकात नोंद केलेली नाही आणि पदवी मिळवण्यासाठी आवश्यक तितकी रजा घेतलेली नाही असा ठपकाही शिक्षणाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

याप्रकरणात संबंधित शिक्षकांना तत्कालीन केंद्र प्रमुख आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याचा संशय असल्याने या सर्वांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून लेखी खुलासे मागविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ही सर्व चौकशी येत्या १५ दिवसात पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांच्या पदवी मिळविण्याच्या करामतीबाबत लवकरच मोठा खुलासा होणार आहे.

Web Title: 126 teachers inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.